बदलत्या सामाजिक समस्या समजून घेणे आवश्यक: कथाकार राम तरटे

जागतिक समाजकार्य दिना निमित्याने: ‘मी कसा घडलो’ उपक्रमात कथाकार राम तरटे यांनी उलगडले जीवनरंग

 

समाज आणि देश मोठ्या प्रमाणात बदलतो आहे. विकासाच्या नव्या वाटेवरती आपण वाटचाल करत आहोत. एकीकडे समाज आणि देश बदलतो आहे तर दुसरीकडे सामाजिक समस्याही तितक्याच मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. त्यामुळे या बदलत्या सामाजिक समस्यांचा चिकित्सक अभ्यास करून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध कथाकार तथा पत्रकार राम तरटे यांनी व्यक्त केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिकशास्त्र संकुलात जागतिक समाजकार्य दिना च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘मी कसा घडलो’ या उपक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. घनश्याम येळणेडॉ. नितीन गायकवाडडॉ. स्मिता नायर,  प्रा. ओमकार मठपती यांची उपस्थिती होती. 

विद्यापीठाच्या विविध संकुलात ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावीयशस्वी मान्यवरांच्या जीवनातून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी ऊर्जा मिळावी यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या संकल्पनेतून ‘मी कसा घडलो’ हा नावीन्यपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत कथाकार तथा यशस्वी पत्रकार राम तरटे यांना आज निमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी राम तरटे आणि विद्यार्थ्यांशी हितगुज करताना आपण कसे घडलो. त्यासाठी काय काय संघर्ष करावा लागला. कसे कष्टपरिश्रम घ्यावे लागले. हे अगदी सहज आणि सोप्या भाषेत सांगितले. कितीही संकट आलीसंघर्ष करावा लागला तरी नैराश्यात न जाता त्या संकटातून नवीन मार्ग शोधून काढता आला पाहिजेत. संकट काळात ज्यांना योग्य मार्ग निवडता आलास्वतःवरचा संयम कायम राखता आला. अशी माणसे निश्चितपणे यशस्वी होतात. हा माझाही अनुभव असल्याचे सांगतानाच समाजकार्यात येणाऱ्या प्रत्येकाने आपल्या कुटुंबापासून समाजकार्याची सुरुवात करावी. आई-वडिलांचा मान सन्मान राखतानाच त्यांना आपल्यापासून अलिप्त ठेवू नये. कारण आपण आपल्या आई-वडिलांना अलिप्त ठेवून सामाजिक कार्य करायला लागलो तर त्या कार्याला अर्थ उरत नाही. आपण समाजात ज्या पद्धतीने वर्तन करत असतो त्या पद्धतीने समाज आपल्याकडे बघत असतोकिंबहुना कधी-कधी आपल्या वर्तनाचे समाजातील इतर घटक अनुकरण करत असतात. या अनुकरणाचा परिणाम सामाजिक स्वास्थ्यावर होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने समाज कार्य करत असताना त्या कार्याची सुरुवात आपल्या कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेपासून करावी असेही ते यावेळी म्हणाले. 

ते पुढे म्हणाले कीप्रत्येकाचे आयुष्य हे एक कादंबरीएक महाकाव्य असते. काही जणांच्या जीवनात कष्ट,दारिद्र्यभूकसंघर्ष असतो तर काही जणांचे आयुष्य अगदी सहजऐश्वर्यपूर्णविलासीआनंदी असते. त्यामुळे आपापले आयुष्य जगतानाकाम करतानाकोणतीही कृती करताना सामाजिक हित लक्षात ठेवूनच ती केली पाहिजे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. स्मिता नायर यांनी केले. यावेळी मा. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. हणमंत कंधारकर यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या संकल्पनेचे स्वागत केले आणि आपली भूमिका मांडली. सूत्रसंचालन आविनाश चिंतले यांनी केले तर आभार डॉ. नितीन गायकवाड यांनी मानले.


कथाकथनांने हास्याची रंगपंचीम 

रंगपंचमीचे वातावरण अजूनही जाणवते आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कथाकार राम तरटे यांनी आज अस्सल बोलीभाषेतील ‘बारा आण्याची बोंब’ ही कथा सादर करून विद्यार्थ्यांना हास्याच्या रंगपंचिमित बुडवले. पोटभर हसणारे विद्यार्थी कथेच्या शेवटी अंतर्मुखही झाले होते.

टिप्पण्या