सेंट्रल रेल्वे एम्पलॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉम्रेड वेणू नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत २५ फेब्रुवारी २०२५ रोजी मुलांचा कॅश अवार्ड गुणगौरव सोहळा कल्याण इन्स्टिट्यूटमध्ये संपन्न झाला. याप्रसंगी मुख्य पाहुणे मा. महेंद्र गांगुर्डे ( सी. एम. एस. कल्याण), मा. राकेश अहिरे ( एम.डी. एम. ई. कल्याण), कॉम्रेड पुष्कर पाटील ( अध्यक्ष _ ई. सी. सी. सोसायटी ), कॉम्रेड जे. एन. पाटील ( सल्लागार ), कॉम्रेड रसिक मलबारी ( कार्याध्यक्ष), मा. मनोज कुमार ( वी. पी. चीफ मॅनेजर) उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत रूपाने सत्कार झाल्यानंतर मा. महेंद्र गांगुर्डे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मा. राकेश अहिरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या जीवनात कॅश अवार्डचे काय महत्त्व आहे, महामंत्री कॉम्रेड वेणू नायर यांनी मुलांना मार्गदर्शन करताना एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कार्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे भारतात कोणतेही संकट आले तर, प्रत्येक वेळा या सोसायटीमार्फत मदत केली जाते. यापुढेही सोसायटी मार्फत मदत केली जाईल. मुलांचा कॅश अवार्ड गुणगौरव सोहळा दरवर्षी केला जातो. मध्य रेल्वेच्या प्रत्येक विभागात सोसायटी मार्फत हा कार्यक्रम केला जातो. सोसायटीच्या भागधारकाच्या ज्या मुलांना चांगले गुण मिळाले आहेत, त्यांना कॅश अवॉर्ड देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. शेवटी सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष कॉम्रेड पुष्कर पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा