*नवी मुंबईत प्रथमच गरवारे ॲप्लीकेशन स्टुडिओची सुरुवात*


नवी मुंबई सानपाडा येथील मराठी उद्योजक व माजी सैनिक  शिवाजी शंकर देसाई आणि त्यांचा मुलगा सुरजकुमार यांनी दोन वर्षांपूर्वी बेलापूर येथे टेक डिटेलर्स नावाची पहिली शाखा सुरू केली. त्यांना कामाचा आलेला अनुभव व लोकांच्या मागणीचा विचार करून गरवारे ॲप्लीकेशन स्टुडिओ( पेंट प्रोटेक्शन फिल्म) सुरू करण्याचा त्यांनी निर्धार केला.  नवी मुंबईतील हा एकमेव अधिकृत स्टुडिओ आहे.

या स्टुडिओमध्ये कारवर ( चार चाकी वाहन )  गरवारे कंपनीचे  पेंट प्रोटेक्शन फिल्म व भारत सरकार मान्यताप्राप्त काचेवर सन मुन प्रोटेक्शन फिल्म लावल्या जातात. यामुळे वाहनांचा रंग अबाधित राहतो. त्याचबरोबर वाहनांचे अंतर्गत व बाह्य डिटेलिंग व वॉशिंग केले जाते. तेव्हा मुंबई,  नवी मुंबई व सर्व वाहन मालकांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा असे आव्हान सुरजकुमार शिवाजी देसाई यांनी केले आहे.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या