नायगांव प्रतीनीधी:
येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणारा उमरी तालुक्यातील बळेगाव येथील आठवीत शिकणारा रितेश मारोती सुर्यवंशी हा विद्यार्थी पोहण्यासाठी कालव्यात गेला होता. पण तो वाहून गेल्याची घटना दि. 5 रोजी दुपारी घडली. वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येत आहे.
नायगाव येथील सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय वसतीगृहात राहून शहरातील एका खाजगी शाळेत आठवीत शिकणारा रितेश सुर्यवंशी यासह अदि सहाजन शाळेला जाण्यासाठी बुधवारी दुपारी नोंद करुन बाहेर पडले. मात्र शाळेत न जाता ते मनार प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात पोहण्यासाठी गेले. पण सहा पैकी रितेश मारोती सुर्यवंशी (13) बळेगाव ता. उमरी हा कालव्याच्या पाण्यात बुडाला.
मात्र यातील पाच विद्यार्थी 3.40 वाजता परत आल्यानंतर सदरची घटना उघडकीस आली. सुरुवातील या विद्यार्थ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पण विश्वासात घेवून विचारपूस केल्यानंतर रितेश सुर्यवंशी हा कालव्यात बुडाल्याचे सांगितले वाहून जाताना पाहिले पण मजाक करत असेल वाटले काही वेळ वाट बघून निघूगेले या विद्यार्थ्यांनी वसतिगृहातून बाहेर पडताना दप्तरात पुस्तकाऐवजी कपडे घेवून गेल्याची बाब नंतर उघड झाली.
या घटनेची माहिती नायगाव पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व वसतिगृहातील कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली असता कालव्याच्या वर दप्तर दिसून आले. कालव्याच्या बाजून लांबपर्यंत जावून शोध मोहीम राबवण्यात आली पण सायंकाळपर्यंत वाहून गेलेल्या रितेश सुर्यवंशी याचा शोध लागला नाही.

addComments
टिप्पणी पोस्ट करा