*सानपाडा येथे महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांना फराळ वाटप*

नवी मुंबई सानपाडा येथील  समाजसेवक शंकर माटे, भाऊ भापकर,  पांडुरंग आमले व बाबाजी इंदोरे यांनी शिव मंदिर व गणेश मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांना खिचडी, राजगिरा लाडू, खजूर, केळी, ताक व फळांचे वाटप केले. याप्रसंगी माजी नगरसेवक बाळाराम पाटील,   सोमनाथ वासकर, शिरीष पाटील, सुरेश  दिवे,  उबाठाचे विभाग प्रमुख अजय पवार,  सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे  उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, डॉ. विजया गोसावी,  खजिनदार विष्णुदास मुखेकर,  सहखजिनदार सुभाष बारवाल,  बळवंतराव पाटील, भानूमती शहा, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, मराठा विकास प्रतिष्ठानचे सहसचिव ज्ञानेश्वर जाधव, बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आनंद गावडे, संचालक वसंत गावडे, मिलेनियम टॉवर बी टाईप सहकारी हाउसिंग सोसायटीचे मॅनेजिंग कमिटी मेंबर आणि चित्रपट व दूरदर्शन मालिकेतील मराठी अभिनेते शिवाजी पाटणे, सिताराम मास्तर उद्यानातील  ७.५० गार्डन ग्रुपचे अध्यक्ष सदाशिव तावडे, सचिव दत्तात्रेय कुरळे,  खजिनदार रणवीर पाटील,  सामाजिक कार्यकर्ते राजू सैद, अशोक कवडे,  रामदास आतकरी,  गणेश हुले, श्रीरंग चिकणे, लक्ष्मण उरसळ,  मारुती पाटील, एन .बी.  शंका,  आदी मान्यवरांनी उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.  सानपाडा विभागातील हजारो शिवभक्तांनी शंकर भगवानचे दर्शन घेऊन फराळाचा लाभ घेतला. फराळ वाटपात महिलांचा विशेष सहभाग  होता.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या