मुंबई महानगरपालिकेमध्ये निरनिराळ्या खात्यामध्ये काम करणारे कामगार, कर्मचारी, अभियंते, परिचारिका, तंत्रज्ञ, शिक्षक व सुरक्षा रक्षक यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ देणार नाही. अशी ग्वाही म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली. मुंबईत आझाद मैदानावर १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई महानगरपालिकेचे हजारो कामगार कर्मचारी न्याय मागण्याविषयी तीव्र घोषणा देत मोर्चात सहभागी झाले होते. पालिका आयुक्तांनी करोडो रुपयाची कामे जाहीर केली आहेत. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निधीची होणारी उधळपट्टी व सर्वसामान्य नागरिकांची करवाढ थांबून कामगार, कर्मचारी, परिचारिका, तंत्रज्ञ, शिक्षक, सुरक्षा रक्षक व अभियंते यांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवाव्यात. अशी मागणी अशोक जाधव यांनी मोर्चासमोर केली. महापालिकेत 29618 घनकचरा काम करणाऱ्या कामगारांना राज्य सरकारच्या धोरणानुसार मालकी हक्काची घरे मिळाली पाहिजेत. कामगारांच्या वारसांना त्वरित नोकऱ्या दिल्या पाहिजेत. महापालिकेच्या निरनिराळ्या प्रवर्गाच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये पदोन्नतीची व रिकाम्या झालेल्या हजारो जागा त्वरित भरण्यात याव्या, आणि भरतीमध्ये कामगारांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात यावे. याप्रसंगी अनुसूचित जमातीच्या 30 हजार रिकाम्या जागा त्वरित भरा. नवीन नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा. कामगार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यामध्ये दुप्पट झालेली वाढ पूर्वलक्षी प्रभावाने १ जानेवारी 2016 पासून थकबाकीसह देण्यात यावी. सामुदायिक वैद्यकीय गटविमा योजनांमध्ये करण्यात आलेला भेदभाव रद्द करून सर्वांना समान ५ लाख कॅशलेस सुविधा असणारी सामुदायिक वैद्यकीय गटविमा योजना त्वरीत लागू करण्यात यावी. वरील मागण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगारमंत्री व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून मुंबई महानगरपालिकेच्या कामगार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा कामगारांना नाविलाजाने न्याय मागण्यांबाबत. तीव्र आंदोलन करावे लागेल व त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, याची नोंद घ्यावी. यावेळी मोर्चामध्ये युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*मुंबई महानगरपालिका कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ देणार नाही _ अशोक जाधव*
• Global Marathwada

addComments
टिप्पणी पोस्ट करा