महाराष्ट्राच्या प्रशासनाला विश्वासार्ह चेहरा देण्याचे काम महसूलचे - अपर मुख्य सचिव राजेश कुमार

  *महसूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ* • *माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले ध्वजारोहण*    ना...


 

*महसूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ*

• *माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले ध्वजारोहण*  

 नांदेड दि. 21 फेब्रुवारी :- कोणत्याही राज्याची, जिल्ह्याची ओळख तिथल्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरून ठरते. राज्याचे प्रशासन कसे आहे हे महसूल कर्मचाऱ्यांच्या परिश्रम, वृत्ती व सचोटीवर ठरते.  महसूल कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे व दर्जेदार कामांमुळे देशात महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी आज येथे केले. महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे शानदार राजवैभवी उद्घाटन नांदेडमध्ये करण्यात आले. ध्वजारोहण माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले. 

महसूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 21 ते 23 फेब्रुवारी नांदेडमध्ये संपन्न होत आहेत. आज श्री. गुरूगोविंद सिंघजी स्टेडियम येथे शुभारंभ झाला. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंद तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, अपर मुख्य सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप गावडे,निवृत्त जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जीएसटीचे सहआयुक्त अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर आयुक्त महसूल नैना बोंदार्डे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, अपर आयुक्त प्रदिप कुलकर्णी, नितीन महाजन, सहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा, मेघना कावली,  निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची उपस्थिती होती. 

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलतांना राजेशकुमार यांनी बारा वर्षानंतर या स्पर्धांचे आयोजन होत असल्याचा आनंद व्यक्त केला. या स्पर्धांचे नियोजन करणारे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, यांनी दर्जेदार स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांनी कौतूक केले. नांदेडमध्ये असणाऱ्या क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, निवासाची व्यवस्था यामुळे याठिकाणी केवळ महसूलच्याच नव्हे तर अंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. 

महसूल विभाग हा राज्याच्या प्रशासनाचा कणा असतो. यामुळे या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी दर्जेदारच असतात मात्र फायलींमध्ये प्रशासनाचे कसब दाखवणारे आता मैदानावर आपले प्राविण्य दाखविणार असल्याचा आनंद आहे. अगदी शिपाई पासून तर अप्पर मुख्य सचिवांपर्यंत आम्ही सगळे मैदानावर एक होऊन खेळतो. ही आमची एकजूट महसूलला वेगळी बळकटी देत असेही त्यांनी स्पष्ट केले.  

यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी उद्घाटनपर भाषण करतांना महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या सर्व क्षेत्रातील वाटचालीबद्दल गौरवउद्गार काढले. त्यांनी कर्मचाऱ्यांवरील ताण तणाव हलका करण्यामध्ये क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उपयोगी पडत असल्याचे सांगितले. या स्पर्धांना निधी कमी पडणार नाही, अशी तरतूद करण्याची सूचना केली. तत्पूर्वी त्यांनी ध्वजारोहण केले. तसेच खेळाडुंना शिस्त व सांघिक भावनेची शपथ दिली. 

याप्रसंगी खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंद तिडके, आमदार बालाजी कल्याणकर यांनी शुभेच्छापर संबोधन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवार, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे प्रतिनिधी पोपंटवार, महाराष्ट्र राज्य नायब तहसिलदार संघटनेचे अध्यक्ष किरण अंबेकर, महाराष्ट्र राजपत्रित संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सचिन खल्लाळ, महाराष्ट्र राज्य अप्पर जिल्हाधिकारी संवर्गाचे प्रतिनिधी दिपाली मोतियेळे यांनीही संबोधित केले. यावेळी “अविरत महसूल” या राज्यस्तरीय स्मरणिकेचे अनावर करण्यात आले. राज्यातील जवळपास अडीच हजार कर्मचारी या स्पर्धेनिमित्त नांदेडमध्ये आले आहेत. पुढील 3 दिवस ही स्पर्धा नांदेड येथे रंगणार असून क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. 

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel