परभणीच्या आद्या बाहेतीची आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड – पालकमंत्री ना. मेघना साकोरे - बोर्डीकर यांच्या हस्ते सत्कार


परभणीच्या आद्या पूजा महेश बाहेती हिची वडोदरा (गुजरात) येथे होणाऱ्या जागतिक टेबल टेनिस युवा मालिकेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२५ दरम्यान समा क्रीडा संकुल, वडोदरा येथे आयोजित करण्यात आली आहे.

आद्या बाहेती ही महाराष्ट्रातील अव्वल मानांकित टेबल टेनिस खेळाडू असून, भारतातील टॉप १० खेळाडूंमध्ये तिचा समावेश आहे. यंदाच्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या नामांकन स्पर्धांमध्ये तिने ४ सुवर्ण व १ कांस्यपदक जिंकत राज्य अजिंक्यपद पटकावले आहे. तसेच, भारतीय महासंघाच्या सहा स्पर्धांपैकी एका अंतिम फेरीत प्रवेश करत रौप्यपदक पटकावले आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या हस्ते आद्याचा सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे जिल्हा सचिव गणेश माळवे, प्रशिक्षक चेतन मुक्तावार, संजय भुमकर, तसेच बाळू बुधवंत उपस्थित होते.

आद्या बाहेतीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परभणी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे.

टिप्पण्या