समस्या निराकरण मानसिकता विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण- प्रो. मुनवर खान


नांदेड:( दि.१४ फेब्रुवारी २०२५)

                 यशवंत महाविद्यालयात पीएम -उषा योजनेतील इनोव्हेशन  व्याख्यानमालेअंतर्गत रसायनशास्त्र विभागाद्वारे चौथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

                  माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रो. मुनवर खान, प्राध्यापक, वॅक्सन युनिव्हर्सिटी, हैदराबाद यांचे "डिझाईन थिंकिंग प्रॉब्लेम सॉल्विंग अँड क्रिएटिव्ह बिल्डिंग इनोव्हेटिव्ह माईंड सेट " या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

                   व्याख्यानाच्या अध्यक्षपदी उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रमुख व्याख्याते प्रो.मुनवर खान, रसायनशास्त्र विभागप्रमुख  डॉ.एम.ए.बशीर, गणित विभागाचे डॉ.व्ही.सी.बोरकर व व्याख्यानमालेचे समन्वयक  डॉ. एस.पी.वर्ताळे विचारमंचावर उपस्थित होते. 

                प्रारंभी प्रास्ताविकात डॉ.एस.पी. वर्ताळे यांनी, व्याख्यानमालेचा उद्देश सांगितला व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

                    व्याख्याते प्रो.मुनवर खान यांनी, विद्यार्थ्यांना समस्या सोडविणारी नाविन्यपूर्ण मानसिकता विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे; कारण ती सृजनशीलता, अनुकूलता आणि गंभीर विचारसरणीला चालना देते तसेच जी कौशल्य आजच्या वेगवान बदलणाऱ्या जगात यशासाठी आवश्यक आहेत; ती आत्मसात करण्यासाठी नावीन्यपूर्ण मानसिकता का आवश्यक आहे, याच्याबद्दल माहिती दिली. 

                   अध्यक्षीय समारोपात  उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे यांनी, रसायनशास्त्र विभागाची परंपरा सांगितली आणि विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात असलेल्या संधी या विषयी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. 

                   सूत्रसंचालन डॉ.संदीप खानसोळे यांनी केले तर आभार डॉ.दत्ता कवळे यांनी मानले .

                  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.सुभाष जूने, डॉ.विजय भोसले,डॉ. शिवराज शिरसाठ, डॉ.कविता केंद्रे, डॉ.दत्ता कवळे, डॉ.मदन आंबोरे, डॉ.अनिल कुवर, प्रा.शांतूलाल मावसकर, डॉ.निलेश चव्हाण, प्रा.संतोष राऊत व प्रा.स्नेहलकुमार पाटील, कर्मचारी विठ्ठल इंगोले, गोविंद शिंदे, किशन इंगोले, ज्ञानदेव साखरे आणि मारुती बत्तलवाड आदींनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, डॉ. अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या