*38 नॅशनल गेम्स उत्तराखंड, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस महिला व पुरुष संघ अंतिम फेरीत दाखल*


उत्तराखंड (डेहराडून)

38 वी नॅशनल गेम्स उत्तराखंड

महाराष्ट्र राज्य महिला गटाने दिल्ली, तामिळनाडू, उत्तराखंड राज्यास पराभूत करून उपांत्य फेरीत दाखल झाला.

 दि. 10 फ्रेबु रोजी टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा डेराहडून येथे महिला गटात उपांत्य फेरीत 

सामना महाराष्ट्र वि. हरियाणा दरम्यान लढतीत 

दिया चितळे (कर्णधार)  वि. स्नेहा भोईंमिक 11-3,12-14,11-8,12-10

स्वस्तिका घोष वि पृथ्वीकी चक्रवर्ती 11-6,11-2,11-9,

तनिषा कोटेचा वि .श्रीदतरी रॉय 11-6,7-11,11-7,11-3

महाराष्ट्र महिला संघाने 3-0  सरळ सेट हरीयाणा संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

            महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष गटात दिल्ली, वेस्ट बंगाल, उत्तराखंड संघास पराभूत करून  उपांत्य फेरीत दाखल .


उपांत्य सामन्यात महाराष्ट्र वि. तेलंगणा दरम्यान जश मोदी वि फ्रेडेल रिफीक  11-06, 11-07,11-9 सरळ तीन सेट मध्ये धुवा उडवला.

रेगन अल्बुकर्क वि मोहंमद अली 11-9,11-9,11-6 या

चिन्मय सोमय्या वि स्वरमेंदु सोम 10-12,11-01,

11-09,11-3 अशा 3-1 सेट मध्ये तेलंगणा चार पराभव करत,महाराष्ट्र राज्य अंतिम फेरीत दाखल झाला.

          महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन पदक प्रमुख संजय शेट्टे , स्मिता शिरोळे , सुनील पूर्णपाञे यांनी महाराष्ट्र संघास भेट देऊन प्रोत्साहन दिले.

         महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, क्रीडा मंञी दत्तात्रय भरणे,सरचिटणीस नामदेव शिरगावकर , टेबल टेनिस राज्य अध्यक्ष प्रविण लुंकड, राज्य सरचिटणीस यतिन टिपण्णीस, प्रकाश तुळपुळे, यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या