'स्मृतिगंध' आठवणींचे संचित असलेला ग्रंथ : प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन

सेलूत 'स्मृतिगंध'चे अनोख्या पद्धतीने प्रकाशन सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था ही उपक्रमशील संस्था आहे. नूतनचे वातावरण स...


सेलूत 'स्मृतिगंध'चे अनोख्या पद्धतीने प्रकाशन

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था ही उपक्रमशील संस्था आहे. नूतनचे वातावरण सकारात्मक आहे. नूतन महाविद्यालय केवळ सिमेंटच्या भिंतीवर उभे नाही. तर श्रध्दा, चारित्र्य, नैतिकता, गुणवत्ता हा संस्थेचा भक्कम पाया आहे.

नूतन महाविद्यालयाच्या माजी कर्मचाऱ्यांच्या आठवणींचा समावेश असलेला ' स्मृतिगंध ' हा ग्रंथ पुढील पिढीला चांगले काम करण्याची प्रेरणा देणारा आणि आठवणींचे संचित असलेला ग्रंथ आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे ( लातूर ) यांनी केले.

नूतन महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या ९२ व्या वाढदिवसाचे औचित्यासाधून त्यांच्यात संकल्पनेतून साकारलेल्या 'स्मृतिगंध' पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ.रोडे यांच्या हस्ते बुधवारी (२२ जानेवारी) रोजी अनोख्या पद्धतीने झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. या प्रसंगी प्राचार्य द.रा.कुलकर्णी, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, माजी ग्रंथपाल अरविंद जोशी, डॉ.प्रभाकर देव, डी.के.देशपांडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, गौतम सूर्यवंशी, प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, डॉ.राजाराम झोडगे, प्रा.हेमचंद्र हडसनकर, प्रा.मोहन पाटील, डॉ.गंगाधर गळगे, उपप्राचार्य डॉ.महेंद्र शिंदे यांची उपस्थिती होती. प्राचार्य द.रा.कुलकर्णी म्हणाले, " नूतन विद्यालय शिक्षण संस्था ही नैतिक मूल्यांची जोपासना करणारी संस्था आहे. स्थापनेपासूनच शैक्षणिक, सामाजिक विकास हे ध्येय घेऊन वाटचाल करणाऱ्या गुणवत्ता, चारित्र्य जपणाऱ्या नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवा." डॉ.प्रभाकर देव, डॉ.संग्राम गवळे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याच नागरिक तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या वतीने प्राचार्य कुलकर्णी यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरक्ष: वर्षाव झाला. मयूर प्रिंटर्सचे संचालक सतीश कुलकर्णी ( नांदेड ) यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ.कोठेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सुभाष बिराजदार यांनी केले. गौतम सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तथा साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उद्योजक रामप्रसाद घोडके, माजी जिप सभापती अशोक काकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

सेलू : सेलू ( जि.परभणी) येथील नूतन महाविद्यालयात 'स्मृतिगंध ' ग्रंथाचे प्रकाशन प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. ( छायाचित्र : शंभू काकडे)


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group