लोहा (वार्ताहर)
- रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांसाठी लिंबोटी धरणातून पाण्याच्या पाच पाळ्या सोडण्यात येणार असून ३डिसेंबर पासून धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.रब्बीसाठी तीन व उन्हाळी दोन असा पाच पाणी पाळ्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत असे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले लिंबोटी धरणातून वेळेवर पंज सोडण्यासाठी त्यांनी उर्ध्व मानार प्रकल्प, नांदेड पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती.
लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील कृषी सिंचनासाठी प्रतापराव पाटील चिखलीकर हे जेव्हा पहिल्यांदाच आमदार झाले होते, त्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी लिंबोटी धरणाचे काम तत्कालीन मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख यांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेले
चिखलीकर पदावर असो अथवा नसो त्यांनी लोहा मतदार संघाच्या विकासासाठी निधीआणला
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत - मतदारांनी ऐतिहासिक मतांनी विजयी केले.ते जननायक ठरले
■ आमदार म्हणून निवडून आल्यानंतर जनतेच्या गाठीभेटी घेत असतांना त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लिंबोटी धरणातून रब्बी हंगामासाठी तीन तर उन्हाळी हंगामासाठी दोन पाणी पाळ्या अशा एकूण पाच पाणीपाळ्या सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली त्यानुसार कालवा समितीची बैठक व . पाटबंधारे विभागाने व उन्हाळी हंगामासाठी पाणी पाळ्याचे नियोजन केले .३ तारखेला लिंबोटी धरणातून पाणी सोडण्यात आले
रब्बी हंगाम पहिली पाळी ३ ते २० डिसेंबर
दुसरी पाळी - ३ ते १८ जानेवारी २०२५
तिसरी।पाळी- ३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२५
उन्हाळी हंगाम ●पहिली पाळी- ३मार्च ते १७मार्च २०२५ दुसरी पाळी-३ ते १७एप्रिल २०२५
असे पाण्याचे रोटेशन राहणार आहे त्यामुळे रब्बी हंगामासह उन्हाळी भिजवन तसेच जनावरांना पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे
. पाटबंधारे विभागाने प्रसिद्धी पत्रक काढून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाणी पाळ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.आ चिखलीकर निवडून आल्या नंतर लिंबोटी धरणातून लाभक्षेत्रात सिचनाची सोय व्हावी यासाठी वेळेवर पाणी सोडण्यासाठी नियोजन करावे असे संबधित विभागास निर्देश दिले आणि पाणी धरणातून सोडण्यात आले हिवाळी व उन्हाळी पाण्याचे रोटेशन राहणार आहे त्यामुळे रब्बी हंगामासह उन्हाळी भिजवन तसेच जनावरांना पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे
addComments
टिप्पणी पोस्ट करा