भारतातील प्रमुख बंदरातील सहा महासंघांच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या २३ नोव्हेंबर २०२४ रोजी गोवा येथे झालेल्या मिटिंगमधील निर्णयानुसार २८ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्येक बंदरात वेतन कराराची अंमलबजावणी त्वरित करा, असे पत्र सर्व बंदरातील कामगार संघटनांनी अध्यक्षांना दिले आहे.
पी. डिमेलो भवन येथे २ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या मुंबई बंदरातील मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी, सुधाकर अपराज व त्यांचे पदाधिकारी, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस, केेरसी पारेख व त्यांचे पदाधिकारी, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष, मिलिंद घनकुटकर, प्लोटीला वर्कर्स असोसिएशनचे उदय चौधरी, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन व मुंबई पोर्ट ट्रस्ट एससी एसटी वेल्फेअर असोसिएशनचे सुधीर मकासरे, मुंबई पोर्ट्र ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे बाबाजी चिपळूणकर व त्यांचे पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत ५ डिसेंबर रोजी सेवेतील कामगारांचा राष्ट्रीय निषेध दिन व १० डिसेंबर रोजी सेवानिवृत्त कामगार व कुटुंबीय यांचा राष्ट्रीय निषेध दिन आणि गरज भासल्यास १७ डिसेंबर रोजी किंवा नंतर बेमुदत संप करण्याचे सर्वानुमते ठरले आहे.
त्यानुसार मुंबई पोर्ट प्राधिकरणातील सर्व कामगार संघटना व लोकाधिकार समिती आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन यांच्या सहभागाने गुरुवार, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता आंबेडकर भवन समोर निदर्शने होणार आहेत. या आंदोलनात गोदी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आव्हान ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे ( वर्कर्स ) जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी केले आहे.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन
addComments
टिप्पणी पोस्ट करा