सायन्स कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी सायन्स कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांनी अध्यक्षस्थान भूषविले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग यांनी पुष्प अर्पण करून करण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत उद्देशिकेचे वाचन केले गेले व महाविद्यालयातून संविधान सन्मान गौरव रॅली आयोजित करून काढण्यात आलेली समाज कल्याण कार्यालय व ज्ञान विकास शिक्षण संस्था कापसी द्वारे महात्मा फुले पुतळा आयटीआय ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन पर्यंत संविधान रॅलीमध्ये सायन्स महाविद्यालयातून भरभरून पन्नास हून अधिक रासीयोच्या स्वयंसेवक  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या रॅलीमध्ये संविधानाने स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय ही सर्वोच्च मूल्य आपल्याला प्रदान केलेली आहेत याची जाणीव ठेवून या मूल्यांची जपवणूक करणे हे आपले कर्तव्य आहे या उद्देशाने उद्देशिकेचे वाचन तसेच संविधान सन्मान गौरव रॅली आयोजन करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी आपले मत मांडले व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उपप्राचार्य प्रा ई एम खिल्लारे यांनी संविधानातील कायदे व त्याची जपवणूक याबद्दल सविस्तर माहिती दिली पर्यवेक्षक प्रा एम आर मुळे यांनी बाबासाहेब यांचे सामाजिक कार्य या विषयावर मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांनी डॉ बाबासाहेबांचे अनुभव व संविधानाचे महत्त्व या विषयावर माहिती देऊन अध्यक्षीय समारोप केला. सायन्स महाविद्यालयात तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत व कनिष्ठ महाविद्यालय सर्व ठिकाणी संविधान दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले 

टिप्पण्या