नांदेड येथे उद्या पासून 63 व्या राज्यस्तरीय दंत परिषदेचे आयोजन


 नांदेड -63 व्या राज्यस्तरीय दंत परिषदेचे आयोजन करण्याचा मान आयडिए महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या वतीने आय. डी. ए नांदेड ला मिळाला आहे.  दि. २९ ,३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर या दरम्यान आ.यडी.ए नांदेड शाखा व नांदेड रुरल डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आशीर्वाद गार्डन, काबरा नगर, येथे भव्य आयोजन करण्यात येत आहे. 

 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कलेक्टर अभिजीत राऊत सर तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणावल  व तसेच नांदेड रुरल डेंटल कॉलेज येथील विनोद कुमार श्रीरामवार ,श्रीनिवास कासवा यांची उपस्थिती राहणार आहे.

आय.डी.ए नांदेड शाखा ही महाराष्ट्रातील प्रमुख शाखा असून दंतव्यवसायाला पुढे नेण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते. दंत परिषदेला डॉक्टर रवींद्रनाथन एम( प्रेसिडेंट आय.डी.ए हेड ऑफिस) ,डॉ.अशोक ढोबळे (ऑनररी सेक्रेटरी जनरल  हेड ऑफिस) डॉ. विष्णुदास भंडारी( प्रेसिडेंट  महाराष्ट्र  राज्य आय.डी.ए शाखा) डॉ. विकास पाटील (ऑनररी सेक्रेटरी आय.डी.ए महाराष्ट्र राज्य शाखा )डॉ.समीर केडिया कॉन्फरन्स सेक्रेटरी , सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शन लाभणार आहे.

संमेलनाच्या सर्व पैलूसह संपूर्ण नवीन मापदंड प्रमाणित करण्यासाठी आयोजन समितीने आपल्या प्रयत्नामध्ये कुठलीही कसर सोडली नाही. संपूर्ण भारतातून अत्यंत प्रतिष्ठित वक्ते या संमेलनामध्ये सखोल मार्गदर्शन लाभणार आहेत. नवीनच दंतवैद्यक शास्त्रातील पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी या परिषदेचे रजिस्ट्रेशन करून लाभ घ्यावा .दंत वैद्यक हे ठिकाण व्यापार प्रदर्शन ,वैज्ञानिक सत्रे व कॉन्फरन्स ऑर्गनायझेशन मध्ये एक आदर्श परिषद म्हणून त्या आठवणी जपतील.

          दंत व्यवसाय करिता लागणाऱ्या विविधह मटेरियल उपकरणे यांचे भव्य प्रदर्शन बघण्यासाठी मोठी संधी दंतवैद्यकांना प्राप्त होणार आहे. दंतक्षेत्र नवनवीन उपचार पद्धती विकसित होत आहे या नवीन तंत्रज्ञानाशी ओळख करून ते आत्मसात करण्याची मोठी संधी या परिषदेमुळे दंतचिकित्सकांना मिळणार आहे.  या परिषदेसाठी  मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशी माहिती डॉ मनीष दगडिया अध्यक्ष आय.डी.ए नांदेड व डॉ. संदीप दंडे सेक्रेटरी आय.डि.ए नांदेड  व कोषाध्यक्ष डॉ राहुल कदम ,मयूर भट्टड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.

या तीन दिवसीय राज्यस्तरीय दंत महा  मेळाव्याचे महाराष्ट्रातील सर्व दंत रोग तज्ञांनी लाभ घ्यावा अशी आव्हान डॉ. अरुण निवळे पाटील ऑर्गनायझिंग चेअरमन यांनी केले आहे.

टिप्पण्या