महात्मा गांधी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रखर पुरस्कर्ते-श्री.दत्ता तुमवाड


नांदेड:( दि.७ ऑक्टोबर २०२४) 

              स्वातंत्र्यसंग्रामात स्त्रियांना सहभाग व सन्मान महात्मा गांधीजींमुळे प्राप्त झाला. महात्मा गांधी सर्वधर्मसमभाव विचारांचे होते तसेच ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रखर पुरस्कर्ते होते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक, वक्ते व समाजसेवक श्री.दत्ता तुमवाड यांनी केले.

            श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यशास्त्र विभागातर्फे 'गांधी विचार: कल्पना, वास्तव आणि भवितव्य' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

          याप्रसंगी विचारमंचावर अध्यक्ष प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे आणि डॉ.वीरभद्र स्वामी यांची उपस्थिती होती.

           यावेळी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन देखील करण्यात आले.

           उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी विषयावर यथोचित विचार व्यक्त करताना, राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी नेतृत्व केले पाहिजे. नैतिकतेवर चालणारी माणसे वयाने कधीही वृद्ध आणि अकाली आजारी होत नाहीत. महात्मा गांधी हा एक विचार आहे आणि तो विचार आजही जिवंत आहे, असे मनोगत व्यक्त केले.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत गायकवाड यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय आणि आभार गणेश विनकरे यांनी मानले.

           याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष निकिता पावडे, उपाध्यक्ष गणेश विनकरे, सचिव आदिती भालेराव, कार्याध्यक्ष सोहा फातिमा, सहसचिव गायत्री पावडे, कोषाध्यक्ष श्रीकांत गायकवाड, प्रसिद्धीप्रमुख साक्षी पाईकराव आणि अंजली हटकर, मोहिनी शिरोळे, प्राची ढगे, सिंधू कांबळे, साची गोवंदे, संजना पवार, गोदावरी कानसुकले, अवधूत गायकवाड, शेख शर्मिन, भूमिका राठोड आणि कृष्णा पिनलवाड या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.

           कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या