रा.से.यो यशवंत' तर्फे महाविद्यालयपरिसर स्वच्छता मोहीम


नांदेड:(दि.६ ऑक्टोबर २०२४)

       माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सुरू झालेल्या 'स्वच्छता ही सेवा' अभियानांतर्गत श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे कॉलेज व कॉलेज परिसर साफसफाई करण्यात आली.

          स्वच्छता ही सेवा संकल्पनेअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना यशवंत महाविद्यालयाने हा तिसरा कार्यक्रम पूर्णत्वास नेला.

           या अंतर्गत स्वयंसेवकांनी महाविद्यालय व महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली.

           याप्रसंगी माजी प्र-कुलगुरु व विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी शुभेच्छापर संदेश देऊन स्वच्छता अभियानास प्रारंभ केला.

              या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.कैलास इंगोले, डॉ.राजरत्न सोनटक्के, प्रा.राजश्री भोपाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.श्रीराम हुलसुरे, प्रा.कांचन गायकवाड, प्रा. माधव दुधाटे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या