नांदेड शहरात जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे जुन्या नांदेड मधील संत दासगणू महाराज पुलावरून पाणी वाहत आहे. प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून लाकडाची बॅरिकेटिंग करून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. छायाचित्र - पुरुषोत्तम जोशी
नांदेडमधील गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.विष्णूपुरी धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदी पात्राच्या पुढील भागातील व सकल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नांदेड रेड अलर्ट...
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या सूचनेनुसार नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, लातूर व बीड या सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे..
addComments
टिप्पणी पोस्ट करा