जे.एम. बक्षी कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढीचा करार*


भारतातील प्रमुख बंदरांमधील सर्वात जुनी असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने जे. एम बक्षी या कंपनीमध्ये १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२८ असा ४ वर्षाचा वेतन करार केला असून, या वेतन करारामुळे कामगारांना कमीत कमी ४४९६ रुपये तर जास्तीत जास्त ६९५३ रुपये पगार वाढ झाली आहे. सरासरी पगारवाढ ५४०१ रुपये आहे. या वेतन करारावर युनियनच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये, सेक्रेटरी श्री. विद्याधर राणे, खजिनदार श्री. विकास नलावडे, कामगार प्रतिनिधी म्हणून श्री. अरुण खाडे आणि श्री. प्रवीण जाधव तर व्यवस्थापनाच्या वतीने उपाध्यक्ष व एच. आर. ई. अरुमुगम आणि मॅनेजर व एच. आर. रितूराज ढाकणे यांनी सह्या केल्या आहेत.

आपला 

 मारुती विश्वासराव 

 प्रसिद्धीप्रमुख 

 मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या