रायगड जिल्ह्या मधील कर्जत तालुक्यातील
झेंड्याची वाडी व उंबरवाडी
गावच्या आदिवासी पाड्यातील
शाळेतील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी व आधुनिक शिक्षणासाठी मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय धोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष व परेल येथील समाजसेवक सूर्यकांत शिंदे यांनी आपल्या संस्थेच्या वतीने सॅमसंग कंपनीचे टॅब,
शाळेसाठी HP कंपनीचे प्रिंटर, इयत्ता १ ली ते ५ वीतील विद्यार्थ्यांना वह्या , दफ्तर, नारळाच्या तेलाची बाटली, लहान मुलांना खोकल्याचे औषध, वृद्धांसाठी मसाज तेल,व बालकांना खाऊ वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई पोर्ट प्राधिकरण लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकूटकर व सौ. घनकूटकर, निळकंठ जाधव, पारस, मानस, कृणाल कांदलकर, सुहास बाबर, संतोष गुजर, रोहीत गुजर, संजय तावडे, प्रमोद मासावकर, राजेश म्हात्रे, महेंद्र पारकर, इसाक शेख, गणेश भगत, विलास कांबळे, प्रविण ब्रीद,शाम चवरकर, सहदेव पोसम, या मान्यवरांनी विशेष सहकार्य केले. सूर्यकांत शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा