नांदेड:(दि.१४ जुलै २०२४)
येथील यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे दि.१६ जुलै २०२४ रोजी बी.एस्सी. प्रथम वर्ष वर्गाच्या रसायनशास्त्र विषयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.
' नॅशनल एज्युकेशन पॉलिसी: २०२०' नुसार रसायनशास्त्र अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेला आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थीकेंद्री असून रोजगाराभिमुख आहे.तसेच या नवीन अभ्यासक्रमात वेगवेगळ्या ज्या शैक्षणिक पद्धती विकसित करण्यात येणार आहेत; त्या विषयी या
कार्यशाळेत चर्चा होणार आहे.आंतरविद्याशाखीय शिक्षणावर सुद्धा या ठिकाणी चर्चा होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आयोजित या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.के.पाटील मार्गदर्शन करणार असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलाच्या संचालिका प्रो.संगीता माकोणे ह्या उपस्थित राहणार आहेत.या कार्यशाळेसाठी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.डी. आर.मुंडे, प्रो.डॉ.खाडे,प्रो.सुरेश ढगे,प्रो.योगेश नलवार,प्रो.जमन अंगुलवार,प्रो.कामीनवार,प्रो. अनिल चिद्रावार, डॉ.एस.बी.शिरसाट हे मार्गदर्शन करणार आहेत.
यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील माजी विभाग प्रमुख डॉ.महेश माळी (कळंबकर) व श्री. जेठेवाड हे नुकतेच जून महिन्यामध्ये सेवानिवृत्त झाले आहेत.त्यानिमित्त त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी या एकदिवसीय शैक्षणिक कार्यशाळेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.एन.शिंदे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एम.ए.बसीर,
डॉ.एस.पी.वर्ताळे,डॉ.एस.बी.जुन्ने,डॉ.व्ही.एन.भोसले,डॉ.एस.बी.शिरसाट, डॉ.एस.व्ही.खानसोळे,डॉ.के.एल.केंद्रे, डॉ.एम.डी.अंभोरे, डॉ.ए.एस.कुवर,डॉ.निलेश चव्हाण,डॉ.डी.एस.कवळे,प्रा. संतोष राऊत,प्रा.शांतुलाल मावसकर आदींनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा