नांदेड दिनांक 26 जून 2024 रोजी सायन्स कॉलेज मध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स हायस्कूल येथील शालेय समितीचे अध्यक्ष मा. नवनिहालसिंह जागीरदार तसेच सायन्स महाविद्यालयातील शालेय समितीचे अध्यक्ष मा. कामरेड प्रदीप नागापूरकर यांची विशेष उपस्थिती होती. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांनी आपले विचार मांडताना स्पष्ट केले की शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, इमारती इत्यादी ठिकाणी तत्कालीन अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश राजश्री शाहू महाराजांनी त्यावेळी कोल्हापूर संस्थानात काढला. दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना डॉ सी बी दागडिया यांनी असे विचार मांडले की शाहूंनी मागास जातीतील गरीब गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती सुरू केल्या. त्यांनी आपल्या राज्यात सर्वांसाठी सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना स्वारातीम नांदेड चे रासेयो चे माजी संचालक प्रो डॉ डी डी पवार यांनी बोलतांना म्हणाले की शाहू महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. समाजात समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता स्थापित करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले.
यानंतर उपप्राचार्य प्रा ई एम खिल्लारे यांनी बोलतांना म्हणाले की लोक कल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराजांनी केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या देशाच्या जडणघडणीत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलीहोती असे उदगार काढले.
राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कार्य फार मोठे आहे. आजही, महाराष्ट्राची ओळख सांगताना 'शाहू-फुले- आंबेडकरांचा महाराष्ट्र' असे उद्गार काढले जाते. महाराष्ट्राची ओळख या तिन्ही त्रिमूर्ती मुळे झालेली आहे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती मुळे आज आपण एकत्र जमले आहोत त्यांना आपण स्मरण केले पाहिजे यासाठी जयंतीचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले आहे. असे उद्गार प्रो डॉ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी काढले व संचालन करून प्रस्तावना केली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रो डॉ डी आर मुंडे यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रा एस एफ गोरे, रजिस्ट्रार श्री गौतम वाघमारे तसेच अधीक्षक सौ अर्चना कुलकर्णी, श्री दिलीप कापुरे, शंकर पतंगे यांची विशेष उपस्थिती होती. महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पित करून जयंती साजरी करण्यात आली
addComments
टिप्पणी पोस्ट करा