*गंगाखेड (प्रतिनिधी)* शहरातील सरस्वती विद्यालयात दिनांक 21 जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना योग शिक्षिका *अभिलाषा गोपाल मंत्री* यांनी आयुष्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सर्व आसन, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके दाखवून त्यामुळे मिळणारे लाभ याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली, तसेच योग, आयुर्वेद, आहार जीवनशैली याविषयी माहिती दिली .याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण मादरपल्ले, उपमुख्याध्यापिका छाया घोळवे, यासह सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.
सरस्वती विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा.
addComments
टिप्पणी पोस्ट करा