नांदेड:(दि.२१ जून २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि.२० जून रोजी वृक्षारोपण करून वृक्षोत्सव पंधरवडा साजरा करण्यात आला.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे आणि डॉ.एच.एस.पतंगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उच्च शिक्षण संचलनालयाने दिलेल्या सूचीनुसार आंबा, चिंच, आवळा, अशोका, कडुलिंब, जांभूळ अशा अनेक वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली.
यावेळी डॉ.बी.आर.भोसले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलास इंगोले, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा. राजश्री भोपाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. कबीर रबडे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, डॉ. मनोज पैंजणे, प्रा.हलसुरे, प्रा. गायकवाड, प्रा. अभिनंदन इंगोले तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा