मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील शेड सुप्रीटेंडंट, मुंबई पोर्टचे बोर्ड मेंबर व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती निमित्त गोदी विभागातील आउटडोअर डॉक स्टाफतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, उभयतांना पोशाख, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस के शेट्ये व इतर मान्यवरांच्या हस्ते १९ जून २०२४ रोजी इंदिरा गोदीत हमालेज बिल्डिंग येथे सत्कार होऊन सन्मान सोहळा संपन्न झाला.
दत्ता खेसे हे ३० जून २०२४ रोजी मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील शेड सुप्रीटेंडंट या पदावरून ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निष्कलंकपणे सेवानिवृत्त आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा गोदी कर्मचाऱ्यांतर्फे सन्मान सोहळा आयोजित केला होता.
याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस के शेट्ये यांनी शुभेच्छापर भाषणात
सांगितले की, दत्ता खेसे हे निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मुंबई पोर्टच्या बोर्डामध्ये कामगारांची बाजू समर्थपणे मांडली. त्यांची सेवाभावी वृत्ती असून ते नेहमीच कामगारांना प्रश्न सोडवण्यास मदत करतात. त्यांचे कामगार तसेच अधिकाऱ्यांबरोबर चांगले संबंध आहेत.
आपल्या भाषणात ॲड. एस. के. शेट्ये पुढे म्हणाले की, भारतातील प्रमुख बंदरात पूर्वी ३ लाख गोदी कामगार होते. आता २२ हजार गोदी कामगार शिल्लक राहिले आहेत. तर मुंबई बंदरात पूर्वी ४० हजार कामगार होते. आता ३ हजार कामगार शिल्लक राहिले आहेत. तरी देखील गोदीचे कामकाज चालू आहे. हा मला पडलेला प्रश्न आहे. कायम कामगार सेवानिवृत्त होऊन त्या ठिकाणी कंत्राटी कामगारांची भरती केली जाते. त्यामुळे कामगार चळवळी समोर आज अनेक मोठी आव्हाने आहेत. त्याचा आपणास एकजुटीने मुकाबला करावा लागेल. मात्र या लढाईत शेवटी कामगारांचाच विजय होईल.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी ट्राफिक मॅनेजर बी. एस. शिंदे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज यूनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी विद्याधर राणे, सेक्रेटरी विजय रणदिवे, प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरसी पारेख, खजिनदार व मुंबई पोर्ट ट्रस्टच्या बोर्ड मेंबर कल्पना देसाई, सेक्रेटरी बबन मेटे, डेप्युटी ट्रॅफिक मॅनेजर सुनील देशमुख, शेंगर, मुंबई पोर्ट अँड डॉक फिलोंथरॉपिक फाउंडेशनचे पदाधिकारी प्रदीप गोलतकर, एस. सी.एस.टी. वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी संजय बढेकर, आदी मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. सत्काराला सत्कारमूर्ती दत्ता खेसे व पत्नी छाया खेसे यांनी उत्तर दिले. सभेचे सूत्रसंचालन मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लबचे माजी पदाधिकारी, कलाकार व निवेदक श्री. विजय सोमा सावंत यांनी सुंदर केले. आभार मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष प्रदीप नलावडे यांनी मानले.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन
addComments
टिप्पणी पोस्ट करा