आमदार म्हणलं की मोठ्या गाडीत बसून हात हलवणारा.. पांढरे कपडे घालून निव्वळ आश्वासने देणारा नेता आपण पाहीला असंल. पण या सर्व बाबींना फाटा देत सकाळी लवकर उठून वार्डात फेरफटका मारायचा, भेटेल त्या लोकांना रामराम, नमस्कार करायचा. एवढ्यावरच न थांबता त्याच्या हातात हात घालायचा, बोलायचं लगेच त्याच्या कडून प्रश्न जाणून घ्यायचे आणि नुसते जाणून घेऊन थांबायचं नाही तर ते सोडवायचे. असा कामाचा सपाटा लावणारे नांदेड उत्तर चे आमदार लोकसेवक बालाजीराव कल्याणकर...!
घरात कोणत्याही प्रकारची राजकीय पाश्वभूमी नाही. आई वडील शेतकरी...! बालाजीराव कल्याणकर यांना दोन भाऊ, तीन बहीणी... बालाजीराव यांनी प्राथमिक शिक्षण तरोडा खु येथील जिल्हा परिषद शाळेत घेतले तर यशवंत महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले. नंतर ते व्यवसायात उतरले. शिवसेनेचे काम करत असतांना शिवसेनेच्या तिकीटावर महापालिकेच्या निवडणुकीत एकमेव नगरसेवक म्हणून निवडून आले. महापालिकेत विरोधी पक्षनेते पद भूषविले. लोकांची कामं करण्यासाठी प्रशासन व सत्ताधा-यांना सळो की पळो करून सोडले. नगरसेवक असतांना आपल्या वार्डात सकाळी नळाला पाणी आले की नाही. नाल्या सफाई झाल्या की नाही. ड्रेनेज ची काम असो की स्वच्छतेचं सगळीकडं लक्ष घालायचं, लोकांमध्ये मिसळायचं.. म्हणूच या भागातीलच नाही तर जिल्ह्यातील लोकांनी त्यांना कार्यसम्राट लोकसेवक अशा पदव्या देऊन खांद्यावर घेतलं आहे. नगरसेवक असतांना निधीची कमतरता होती. तरीही त्यांनी आपल्या भागात मोठ्या प्रमाणात कामे केली.
याच कामाची पावती म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांना 2019 ला आमदारकीचं तिकीट दिलं. बालाजीराव कल्याणकर यांनी राज्य मंत्री राहीलेले अशोकराव चव्हाण यांचे जवळचे आमदार डि पी सावंत यांचा पराभव केला. आमदार झाल्याबरोबर त्यांनी आपल्या भागातील लोकांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये नांदेड उत्तर मध्ये वाडी बु येथे शंभर खाटांचा दवाखाना, कृषी महाविद्यालय, प्रत्येक गल्लीत सिमेंटचे रस्ते, नाल्या, महत्त्वाचं सगळीकडे मोठ्या प्रमाणात ड्रेनेज चं काम त्यांचे लहान भाऊ एकनाथराव कल्याणकर यांनी स्वत: उभे टाकून करून घेतले आहेत आणि सुरूही आहेत. अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत.
औद्योगिक वसाहतीत आजपर्यंत रस्ते नव्हते जिकडे जाल तुकडे खड्डे होते त्या भागात निधी उपलब्ध करून सिमेंट रस्ते केले. चैतन्य नगर ते तरोडा बु., रेल्वे स्थानक ते कुसूम सभागृह असे महत्त्वाचे रस्त्यांची कामे सुध्दा त्यांच्या निधीतून होत आहेत. अनेक मंदिरांना शेड, पेव्हर्स देऊन आपला भाग सगळ्या बाबतीत चांगला कसा होईल याची धडपड त्यांना असते. शहरच नाही तर संपूर्ण उत्तर मतदारसंघील ग्रामीण भागात त्यांनी रोडची कामे केली आहेत. हजारो कोटी रुपयांचा निधी त्यांनी ओढून आणला आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे सोबत घनिष्ठ संबध आहेत. त्यामुळे निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे अशी माहिती आमदार बालाजी कल्याणकर हे सांगतात. लोकांची कामे मोठ्या प्रमाणात होत असल्याने लोकं त्यांना कार्य सम्राट म्हणून गौरव करतात तर कोणी बालाजीराव हे खरे लोकसेवक आहेत असेही म्हणतात. या भागात मुदखेड मतदार संघाचे आमदार साहेबराव बारडकर (बापू) यांच्या नंतर लोकांत मिळणारे आमदार म्हणून गावात गावात ते प्रसिद्ध झाले आहेत. आणखी मोठ्या प्रमाणात लोकांची कामे करून नावारूपाला येण्यासाठी आदरणीय बालाजीराव कल्याणकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा!!
बालाजी पवार,
नांदेड
मो. 9890860124
addComments
टिप्पणी पोस्ट करा