बारदाणा ' कथासंग्रहाचे रविवारी प्रकाशन

नांदेड(दि.१५ मार्च २०२४)

          मराठीतील आघाडीचे कथालेखक व महानुभाव साहित्याचे अभ्यासक यशवंत महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ.संजय जगताप यांच्या शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर यांनी प्रकाशित केलेल्या 'बारदाणा ' या दुसऱ्या कथासंग्रहाचे प्रकाशन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, साहित्यिक मा.श्री.श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते रविवार, दि.१७ मार्च २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता यशवंत महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात होणार आहे. 

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील आघाडीचे नाटककार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख व ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.दत्ता भगत हे राहणार आहेत. 

          कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कथाकार व कवी डॉ.जगदीश कदम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ' बारदाना ' या कथासंग्रहावर भाष्य करण्यासाठी मराठीतील आघाडीचे कथालेखक,शाहिरी व महानुभाव साहित्याचे अभ्यासक डॉ.हंसराज जाधव, प्रतिष्ठान महाविद्यालय, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व प्रभारी प्राचार्य डॉ.मा.मा.जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

          डॉ.संजय जगताप हे सध्या यशवंत महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. महानुभाव साहित्याचे साक्षेपी संशोधक, अभ्यासक म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. त्याचबरोबर त्यांचे महानुभाव साहित्यातील स्त्री प्रतिमा, महानुभावांचे लोकसाहित्य, महानुभाव साहित्याचे सामाजिक दृष्टीने आकलन व आभाळमाती हा कथासंग्रह बळीवंश प्रकाशनाने २०११ मध्ये प्रकाशित केलेला आहे. 

           या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, डॉ.रामदास बोकारे आणि डॉ.संभाजी जाधव यांनी केले आहे.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज