*बंद एनटीसी गिरणी कामगारांच्या थकीत पगाराचे केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या‌ हस्ते वाटप!*


*गिरण्यांच्या चाळींच्या* *पुनर्बांधणीची सचिन अहिर यांची मागणी!

 मुंबई दि.१५: मुंबईतील बंद गिरण्यां,प्रत्येक युनिट निहाय आर्थिक सक्षमता पाहून लवकरच पूर्ववत चालू केल्या जातील,असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रो द्योग मंत्री पियुष गोयल यांनी येथे केले.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या प्रस्तावाचा उल्लेख करून मंत्रीमहोदय असेही म्हणले,एनटीसी गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्बांध णीचा प्रश्नाही लवकरच निकालात काढला जाईल!


    मुंबईसह देशभरात एनटीसीच्या बंद २३ गिरण्यांमधील कोविड काळातील उर्वरित ५० टक्के पगार व इतर देण्यांच्या धनादेशाचे वाटप आज सह्याद्री अतिथी गृहात पार पडले.त्या प्रसंगी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर,आमदार काळीदास कोळंबकर,

रामिम संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते,दिल्ली एनटीसी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता वर्मा उपस्थित होत्या.मुंबई-महाराष्ट्रासह देशभरातील बंद २३ एनटीसी गिरण्यांतील कामगार उपस्थित होते.कोविड काळात कामगारांनी सहकार्य केलेल्या कामाची मंत्री महोदयांनी प्रशंसा केली.

     सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात देशभरातील एनटीसी गिरण्यांच्या प्रश्नावर दिल्ली येथे आंदोलन करण्यात आले.तसेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेण्यात आली होती,या गोष्टीची आठवण करून देऊन सांगितले,या गिरण्या गेली चार वर्षे बंद असून,कामगारांचा न्यायालयाच्या मार्गाने ५० टक्के पगार मिळवून दिला होता असे सांगितले.

    एनटीसी गिरण्यांच्या जमिनी विकून आलेल्या 'टाडिआर'पोटीची रक्कम गिरण्या पूर्ववत चालू करण्यासाठी वापरावी,असा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला होता,असे‌ सांगून सचिन अहिर म्हणाले, मुंबईतील ५० वर्षापेक्षा अधिक काळ धोकादायक एनटीसी गिरण्यांच्या चाळींची पुनर्बांधणी त्वरित व्हावी,अशीही सचिन अहिर यांनी मागणी केली.आमदार कालिदास कोळंबकर यांनीही गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्बांधणीचा प्रश्न उचलून धरला.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी एनटीसी‌ गिरण्या पुर्ववत चालविण्याच्या घोषणेचे स्वागत केले.कार्यक्रमाला खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, सुनिल बोरकर उपस्थित होते. ••••••

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
थोरांदळे गावात हनुमान जयंती उत्सवानिमित्त पुरी, गुळवणी व चटणीचा महाप्रसाद*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 तास मद्य विक्री बंद
इमेज