भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संवाद बैठक व परिषदेमध्ये प्रा.गुरुप्रसाद चौसटे यांचा सहभाग*

नांदेड : (दि.१४ मार्च २०२४)        भारत सरकारच्या अंतराळ विभागातील भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ही नेहमी माहिती तंत्रज्ञानाच्या संशोधनाच्या आधारावर नवनवीन उपग्रह निर्मिती व प्रक्षेपणाचे कार्य; जेणे करून उपग्रहाच्या माहितीच्या आधारे मानवी जीवनासाठी ते बहुमूल्य ठरते व नेहमी अंतराळ संशोधन कार्य करण्यास अग्रेसर असते; या महत्वाच्या भूमीकेतुन भारतीय अवकाश संशोधन संस्थाद्वारे दि.१२ व १३ मार्च रोजी जवाहरलाल नेहरु तंत्रज्ञान विद्यापीठ, हैदराबाद येथे *संवाद बैठक व परिषद* संपन्न झालेली आहे. ज्यात नवनवीन संशोधनावरील प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरातून संशोधक यात सहभागी झाले होते.

           श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागातील प्रा.गुरुप्रसाद चौसटे (चारठाणकर) यांनी इस्रोच्या राष्ट्रीय सदूर व संवेदन केंद्रातर्फे या संवाद बैठकीत सक्रिय व यशस्वी सहभाग घेतला.

           या निवडीबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व विद्यमान प्राचार्य डॉ गणेशचंद्र एन.शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. 

          प्रा.गुरुप्रसाद चौसटे यांना मागील वर्षीचा आंध्रा विद्यापीठ,विशाखापट्टणम यांच्याद्वारे "युवा आचार्य" ( यंग टीचर ) या पुरस्काराने सन्मानीत देखील केले होते.

          या सुयशाबद्दल उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमारानी राव, संशोधन विकास समितीचे समन्वयक डॉ.एम.एम.व्ही बेग, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, विभागप्रमुख प्रा.नितिन नाईक, प्रा.प्रदीप पाठक, डॉ.अजय गव्हाणे, प्रा.गौतम दुथडे, डॉ.प्रवीण मिरकुटे, डॉ.श्रीकांत जाधव, प्रा.सीमा शिंदे, प्रा.संगीता भुसारे, डॉ.प्रवीण तामसेकर, प्रा.आमरीन खान, सचिन वडजे , कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार, गजानन पाटील, सौ.प्रणवी काकडे,माणिक कल्याणकर,तसेच विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज