प्रत्येक महाविद्यालयात भाषांतर विभाग स्थापन केला जावा* -डॉ. दिलीप चव्हाण

नांदेड:(दि.१६ मार्च २०२४) 

          भाषा आणि अनुवाद यांचे अतूट नाते आहे. भाषांतर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माणसाचे बहुभाषिक असणे; हे विशेष वैशिष्ट्य असते. आय.आय.टी., मुंबई आणि महात्मा गांधी विद्यापीठ, वर्धा येथे भाषांतर आणि तंत्रज्ञान एकत्र शिकविले जातात. तरुणांना भाषांतरामध्ये रोजगाराची फार मोठी संधी आहे; त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयात भाषांतर विभागाची स्थापना केली जावी, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील पुरोगामी, स्त्रीवादी व विज्ञाननिष्ठ विचारवंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे डॉ.दिलीप चव्हाण यांनी केले.

            श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित एक दिवसीय वाय.एम.लिट. फेस्ट २०२४ मध्ये उद्घाटकीय बीजभाषणामध्ये ते बोलत होते.

           याप्रसंगी विचारमंचावर उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका व इंग्रजी विभागप्रमुख डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, मराठी विभागप्रमुख डॉ.संजय जगताप, उर्दू विभागप्रमुख डॉ.एस.एम.दुर्राणी, हिंदी विभाग प्रमुख डॉ.संदीप पाईकराव यांची उपस्थिती होती.

           पुढे बोलताना डॉ.दिलीप चव्हाण म्हणाले की, भाषांतरामुळे ज्ञानाचे लोकशाहीकरण होते. एकाच वर्गाचे वर्चस्व कमी होऊन चांगल्या समाजाची निर्मिती होत असते. भाषांतराद्वारे स्त्री- पुरुष समता प्रस्थापित करता येईल. अनुवादाद्वारे समाजामध्ये नवा विचार रुजविला जाऊ शकतो. पंडिता रमाबाई आणि बहिणाबाई ही त्याची उदाहरणे आहेत. जुबान ही हे जगातील पहिले स्त्रीवादी प्रकाशन आहे.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.किरण देशमुख यांनी केले तर आभार प्रा.अजहर अहमद यांनी मानले.

          कार्यक्रमास डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.रत्नमाला मस्के, डॉ.कैलास इंगोले, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, प्रा.माधव दुधाटे, डॉ.सुनील जाधव, डॉ.अजय गव्हाणे आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, राजू अडबलवार, प्रशांत मुंगल, गणेश विनकरे, श्रीकांत गायकवाड यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज