नांदेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्याद्वारे ऑनलाईन लिंक द्वारे नवाेउपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन बाबतचे सादरीकरण पूर्ण झाल्यानंतर द्वितीय टप्प्यातील प्रत्यक्ष सादरीकरण जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डायट येथे घेण्यात आले.
जिल्ह्यातून 8 शाळांनी ऑनलाइन लिंक द्वारे शिक्षकांनी नवाेउपक्रम स्पर्धेत सहभाग नोंदवला होता त्यांचे सादरीकरण काल आठ तारखेला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट येथे घेण्यात आले सदरील उपक्रम स्पर्धेत माध्यमिक गटातून उत्तमरीत्या सादरीकरण केल्याबद्दल श्री.समर्थ विद्यालय पिंपरखेड येथील सहशिक्षक ना. बा. भारती यांचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला आहे सदरील प्रथम क्रमांक बदल संस्थाध्यक्ष व शाळेतील मुख्याध्यापक व इतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
addComments
टिप्पणी पोस्ट करा