अजमेर येथील 812 व्या उर्स करिता नांदेड -अजमेर विशेष गाडी

अजमेर येथील 812  व्या उर्स करिता होणाऱ्या गर्दी ला लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे नांदेड ते अजमेर दरम्यान विशेष गाडीची एक फेरी करण्याचे ठरविले आहे,ते पुढील प्रमाणे - 

क्र. गाडी क्र. कुठून – कुठे गाडी सुटण्याचा दिनांक

1 07641 नांदेड-अजमेर 15.01.2024  

2 07642 अजमेर-नांदेड 20.01.2024

     गाडी क्र.  07641 नांदेड-अजमेर विशेष गाडी  :

हि गाडी नांदेड येथून दिनांक 15 जानेवारी ला सकाळी 08.30 वाजता सुटेल आणि अजमेर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 19.30 वाजता पोहोचेल. या विशेष गाड्या पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, मनमाड, भुसावळ कोर्ड लाईन, खंडवा, इटारसी, भोपाळ, उजैन, रतलाम, भिल्वारा मार्गे अजमेर येथे पोहोचेल. 

 गाडी क्र.  07642 अजमेर- नांदेड विशेष गाडी  :

हि गाडी अजमेर येथून दिनांक 20 जानेवारी ला रात्री 23.20 वाजता सुटेल आणि भिल्वारा, उजैन, खंडवा, मनमाड,औरंगाबाद, जालना, मार्गे नांदेड येथे दिनांक 23 जानेवारी ला सकाळी 05.30 वाजता पोहोचेल. 

या गाड्यांत तृतीय वातानुकुलीत, स्लीपर क्लास आणि जनरल क्लास चे डब्बे असतील.                     

            सोबत : गाडीचे  वेळापत्रक 


                                                                                                               

आदरणीय संपादक महोदयांना विनंती आहे हि बातमी आपल्या प्रतिष्ठित वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी.

जनसंपर्क कार्यालय, नांदेड

टिप्पण्या