नांदेड/प्रतिनिधी- कंधार तालुक्यातील नेहरूनगर येथील माध्यमिक आश्रमशाळेचे सहशिक्षक संतोष चव्हाण यांनी आपल्याला कामावर रूजू करून घेण्याच्या मागणीसाठी मंगळवार दि.30 पासून समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला सूरूवात केली आहे.
नेहरूनगर येथील माध्यमिक आश्रमशाळेचे सहशिक्षक संतोष गोविंदराव चव्हाण यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत संस्थेच्या अध्यक्षांच्या सांगण्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर संतोष चव्हाण यांना निलंबित करण्यात आले होते.या निलंबनाच्या विरोधात त्यांनी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे चौकशी करुन न्याय देण्याची लेखी मागणी केली होती.त्यांच्या मागणीला सहाय्यक आयुक्तांनी बेदखल करत उपोषण न करण्याचा किंवा उपोषण गैर ठरेल असा सल्ला दिला होता.संतोष चव्हाण यांनी केलेल्या मागणीत शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर पवार यांची नियुक्ती नियमबाह्य आहे.तसेच संस्थेचे पदाधिकारी शाळेत कर्मचारी म्हनून कार्यरत असल्याबाबतची चौकशी करावी, संचालकाच्या घरी कर्मचारी कार्यरत असून त्यांची चौकशी करावी,शाळेला मिळालेल्या आहार व शैक्षणिक साहित्य वाटपाची चोकशी करावी यासह अन्य मागण्याचे निवेदन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले होते.या प्रकरणाची चौकशीची मागणी करत अमरण उपोषणाला बसत असल्याचे पत्र दिल्यानंतरही या पत्राची दखल न घेतल्याने नेहरूनगर येथील माध्यमिक आश्रमशाळेचे शिक्षक संतोष चव्हाण यांनी समाजकल्याण विभागाच्या कार्यालयासमोर सुरूवात केली आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा