सुपरहिट मराठी चित्रपटांची अल्ट्रा झकासवर जोरदार हजेरी!*

*अशोक सराफ, सुबोध भावे, उपेंद्र लिमये, श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर, मृण्मयी देशपांडे यांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर अल्ट्रा झकासवर प्रेक्षकांच्या भेटीस!!*

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या दर्जेदार चित्रपटांची जत्रा 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर रसिक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अशोक सराफ आणि उपेंद्र लिमये यांचा समीर पाटील दिग्दर्शित 'शेंटीमेंटल', सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि श्रेयस तळपदे यांचा राजीव पाटील दिग्दर्शित सुप्परहिट 'सनई चौघडे', मास्टर ब्लास्टर सचिनच्या आयुष्यावर आधारित जेम्स एर्स्काइन दिग्दर्शित 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' आणि मृण्मयी देशपांडे, धर्मेंद्र गोहिल या सुप्रसिद्ध कलाकारांचा अंबरीश दरक दिग्दर्शित 'अनुराग' हे चित्रपट 'अल्ट्रा झकास'वर रसिक प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

'शेंटीमेंटल'ची कथा चोरीला गेलेले दागिने पोलिसांना बिहारला पाठवते तर अनुरागची कथा पूर्णपणे आठवणींना उजाळा देत लेह लडाखमध्ये वसते. सनई चौघडे सईच्या वैवाहिक शोधाचा एक नवीन मार्ग असून सचिन अ बिलियन ड्रीम्समध्ये सचिन तेंडुलकरच्या प्रेरक आयुष्याच्या छटा या यशस्वी होण्याच्या पाऊलवाटा आहेत. शेंटीमेंटल आणि सचिन अ बिलियन ड्रीम्स ओटीटीवर उपलब्ध असून अनुराग ८ नोव्हेंबर रोजी तर सनई चौघडे २२ नोव्हेंबर प्रदर्शित होणार आहे.

“वेगवेगळ्या कथाबीजाचे वेगवेगळे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना आवडत असतात आणि आम्ही त्या आवडींची पूर्तता नेहमीच 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीच्या माध्यमातून करत असतो. 'शेंटीमेंटल', 'सनई चौघडे', 'अनुराग' आणि' सचिन अ बिलियन ड्रीम्स' हे प्रतिभावान कलावंतांचे प्रभावी आणि दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना बहाल करताना अत्यानंद होत आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर जबरदस्त सुपरहिट चित्रपटांसोबतच झकास मनोरंजन, सदाबहार एकापेक्षा एक कौटुंबिक, विनोदी, अद्भुत प्रणय कथांसह जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपटांतील ड्रामा अनुभवण्यासाठी लगेच डाउनलोड करा 'अल्ट्रा झकास ओटीटी' ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

*App link:*

 https://ultrajhakaas.app.link

*'शेंटीमेंटल', 'सनई चौघडे', 'अनुराग' आणि' सचिन अ बिलियन ड्रीम्स' या सुपरहिट चित्रपटाचे प्रोमो पाहण्यासाठी लिंक*

https://www.facebook.com/UltraJhakaas

https://www.instagram.com/ultrajhakaas

https://www.youtube.com/@ultrajhakaas

https://twitter.com/ultrajhakaas

*प्रसिद्धी जनसंपर्क :* राम कोंडीलकर,

*राम पब्लिसिटी, मुंबई* 

*इमेल* : ramkondilkar.pr@gmail.com

*मोबाईल* – WhatsApp : 9821498658

टिप्पण्या