यंदाही दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा ; मैदा आणि पोह्याचा देखील समावेश....राम बोरगांवकर

कंधार :  यंदाही दिवाळीनिमित्त कंधार तालुक्यातील ४४ हजार ३०० शिधा पत्रिका धारक कुटुंबीयांना पुरवठा विभागामार्फत शंभर रुपयात आनंदाचा मिळणार आहे. आता यामध्ये मैदा आणि पोह्याचा समावेश करण्यात आला असल्याचे कंधार तहसीलदार राम बोरगांवकर म्हणाले    कंधार तालुक्यातील दिवाळीनिमित्त अंत्योदय, प्राधान्य व शेतकरी अशा ४४ हजार ३०० कार्ड धारक कुटुंबाला आनंदाचा शिधा वितरित होणार आहे. या दिवाळीमध्ये मिळणाऱ्या आनंदाच्या शिधा मध्ये मैदा आणि पोह्याचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यात अंत्योदय कार्ड संख्या ३ हजार १४९ यातील कुटुंबाची सदस्य संख्या १४ हजार ६४६, प्राधान्य कार्ड संख्या ३७ हजार ६७२ यातील कुटुंबातील सदस्य संख्या १ लाख ७८ हजार ४७४, शेतकरी कार्ड संख्या ३ हजार ४७९ यातील कुटुंबातील सदस्य संख्या १४ हजार ७९४ आहे. असे मिळून तालुक्यातील ४४ हजार ३०० कार्ड धारक कुटुंबे असून यात २ लाख ६ हजार ६५९ सदस्यांची संख्या आह* यापूर्वी आनंदाचा शिधा देण्यात आलेल्या किटमध्ये रवा, डाळ, साखर, पामतेल यांचा समावेश होता. या दिवाळीला मिळणाऱ्या किटमध्ये साखर १ किलो, पाम तेल १ लिटर तर अर्धा किलो मध्ये रवा, चणाडाळ, पोहे, मैदा असे जिन्नस असणार आहेत. राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शिध्यामध्ये १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चना डाळ, मैदा आणि पोहे असे जिन्नस असतील. या आनंदाचा शिध्यामधील काही जिन्नस उपलब्ध झाले असले तरी पुर्ण किट उपलब्ध झाली नाही. आनंदाच्या शिध्याची पूर्ण किट दिवाळीच्या पूर्वी वितरित करण्यात येईल. - जि. एल. मोहिजे प्रभारी नायब तहसीलदार पुरवठा विभाग कंधार

टिप्पण्या