पद्मश्री शामराव कदम यांच्यामुळे सहकार क्षेत्राला गती मिळाली -जयप्रकाश दांडेगावकर लिंबगाव येथे पद्मश्री शामराव कदम यांना अभिवादन

नांदेड/प्रतिनिधी पद्मश्री शामराव कदम यांनी सहकार क्षेत्रामध्ये केलेल्या भरीव कामामुळे लाखो लोकांना रोजगार मिळाला. आता सहकाराचे क्षेत्र केंद्...

नांदेड/प्रतिनिधीपद्मश्री शामराव कदम यांनी सहकार क्षेत्रामध्ये केलेल्या भरीव कामामुळे लाखो लोकांना रोजगार मिळाला. आता सहकाराचे क्षेत्र केंद्र सरकारला पटू लागले असून सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी 3 लाख कोटींची गुंतवणुक केंद्र सरकार करणार आहे. कारखाने, बँका, सेवा सोसायट्या अशा विविध सहकार क्षेत्रात पद्मश्रींनी भरीव असे मोठे काम केले, त्यामुळे या क्षेत्राला उभारी मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष तथा पूर्णा सहकारी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.

पद्मश्री शामरावजी कदम यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दि. 15 ऑक्टोबर रोजी लिंबगाव ता. नांदेड येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला त्यानंतर शेतातील समाधीस्थळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आ. राजूभैय्या नवघरे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, डॉ. हंसराज वैद्य, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, रंगनाथ वाघ, हरीभाऊ शेळके, कदम कुटूंबीय, गावकरी यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिवादन केले. याठिकाणी आयोजित कार्यक्रमात दांडेगावकर बोलत होते.
पुढे बोलताना माजी मंत्री दांडेगावकर म्हणाले की, पद्मश्री शामराव कदम यांचा आदर्श घेऊन माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी विविध क्षेत्रात काम केले. पद्मश्री शामराव कदम यांच्यामुळे सहकार क्षेत्र वाढले. त्यांनी सुत गिरण्या, कलंबर कारखाना, पुर्णा सहकारी कारखाना, विविध सोसायट्या असे सहकार क्षेत्रात कितीतरी असे मोठे काम केले. त्यामुळे पद्मश्री शामराव कदम यांचे विचार व त्यांची भुमिका प्रत्येकाने समजून घेऊन कार्य केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
आ. राजूभैय्या नवघरे यांनी नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यामध्ये पद्मश्रींनी मोठे सहकारात काम केले आहे. बहुजनांच्या विकासासाठी त्यांनी काम केले आहे, असे ते म्हणाले. तर डॉ. हंसराज वैद्य यांनी आदर्श नेता, आदर्श माणुस असे पद्मश्रींचे काम होते. सर्वच क्षेत्राला त्यांनी न्याय दिला. जवळपास 70 संस्थांचे ते काम पाहत होते. पद्मश्री यांच्यासारखे काम करायला हवे, असे त्यांनी सांगितले. हरीभाऊ शेळके यांनी पद्मश्रींनी पूर्णा सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवल्याचे सांगत अनेक जिनींग व सहकार क्षेत्रातील त्यांनी काम केल्याचे सांगितले.
माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा आपल्या मनोगतात म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये वसंतदादा चव्हाणांनंतर पद्मश्री शामराव कदम यांनी सहकार क्षेत्रात मोठे काम केले. देशाचे केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केंद्रातील राजकारण पाहिले. तर नांदेड जिल्ह्यात पद्मश्रींनी सहकाराची धूरा सांभाळली. शारदा भवन शिक्षण संस्था, धर्माबाद येथील संस्था, कलंबर कारखाना, तालुका संस्था याला वैभव प्राप्त करून देण्याचे काम पद्मश्रींनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आ. राजूभैय्या नवघरे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, सौ. डॉ. शीला कदम, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, डॉ. हंसराज वैद्य, सुभाष कदम, डॉ. संजय कदम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम, डॉ. सुधाकर बोकारे, सतिश शिरूरकर, पाटील, रंगनाथ वाघ, दत्तात्रय कदम, हेमराज पाटील, शहाजीराव देसाई, नितीन महागावकर, शिवाजीराव सौराते, रमेश पावडे, अशोक भोजने, गंगाधरराव कदम, माजी विरोधी पक्षनेता जीवन घोगरे पाटील, गंगाधर कवाळे पाटील, बंटी लांडगे, गणेश तादलापूरकर, राहुल जाधव, जयेंद्र पाटील, हरीभाऊ शेळके, धनंजय सुर्यवंशी, कन्हैया कदम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील कदम, उद्धवराव कदम, अजय कदम, श्रीधरराव पारवे, गजानन धवन, आर.पी.कदम, संजयराव कदम, गोपाळराव कदम, तातेराव पाटील आलेगावकर, विश्‍वास कदम, तानाजी भालेराव, मनोहर कदम, प्रकाश कदम, गोपाळराव कदम, नाना पोहरे, वामनराव कदम, बालाजी सुर्यवंशी, बालाजी महागावकर, कादर पाशा, अ‍ॅड. प्रकाश घोगरे, प्रकाश मुराळकर, प्रशांत कदम, सतिश कदम, मनोहर कदम, संदीप कदम, गोपाळराव कदम, प्रविण घुले, मयूर कोकरे, प्रशांत गवळे यांच्यासह लिंबगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांची अभिवादनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कृषि महाविद्यालयाला पद्मश्रींचे नाव द्या
सहकार क्षेत्र यासह विविध क्षेत्रामध्ये पद्मश्री शामराव कदम यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे कार्य लक्षात घेता नांदेड येथे होत असलेल्या कृषि महाविद्यालयाला पद्मश्री शामराव कदम यांचे नाव द्यावे अशी मागणी येथील गावकर्‍यांच्यावतीने करण्यात आली. तसेच माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा यांनी देखील पद्मश्रींचे नाव देण्यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group