लोणावळा येथे सानपाड्यामधील ज्येष्ठ नागरिकांची पावसाळी सहल*


नवी मुंबईतील सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांची पावसाळी सहल १८ व १९ जुलै २०२३ रोजी लोणावळा येथे न्युसी रिसॉर्टमध्ये निसर्गरम्य अशा वातावरणात संपन्न झाली. या सहली दरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी लोणावळा येथे मुसळधार पाऊस असताना देखील एकविरा देवीचे दर्शन, स्वामी समर्थांचा मठ, महड गणपती दर्शन, गगनगिरी महाराज मठ, नारायणी धाम मंदिर व मळवली येथील भाजे धबधबा याचा आनंद घेतला. या सहलीमध्ये सानपाडा येथील नगरसेवक सोमनाथ वास्कर, शिरवणे येथील नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार, नवी मुंबई शिवसेना उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव, शिवसेना शाखाप्रमुख अजय पवार, सानपाडा येथील भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते भाऊ भापकर, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे आजी माजी पदाधिकारी राम काजोलकर, चंद्रकांत पार पिल्लेवार, आर. व्ही. खैरनार, सुभाष बारवाल आदी मान्यवरा सहित ६० ज्येष्ठ नागरिक पावसाळी सहलीत सहभागी झाले होते.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
मुंबई शहराचा कणा असलेला कामगार मुंबईतून हद्दपार झाला _* अशोक नायगावकर
इमेज