नव कृष्णा व्हॅली स्कूल येथे पहिली महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेस प्रारंभ


(कुपवाड प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य टेबल टेशन असोसिएशनच्या मान्यतेने सुरज फाउंडेशन यांच्या मार्फत पहिली महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेस प्रारंभ झाला उद्घाटन प्रसंगी मा.संगीता पागनीस डायरेक्टर सुरज फाउंडेशन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव माननीय एन जी कामत त्याचबरोबर प्राचार्य श्री अधिक राव पवार श्री विनायक जोशी इन्चार्ज सुरज स्पोर्ट्स अकॅडमी अश्विनी माने इन्चार्ज आय आय टी मेडिकल सेंटर ऍडमिन ऑफिसर रघुनाथ सातपुते राजेंद्र पाचोरे दत्तात्रेय मुळे आदि मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी महाराष्ट्र असोसिएशनचे मधु लोणारे तसेच खेडकर सर उपस्थित होते सदर स्पर्धा 11 13 17 19 व खुला गट पुरुष व महिला अशा एकूण सहा विभागात स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी दोन लाख रुपये चे रोख रक्कम विभागून देण्यात येणार आहे सदर स्पर्धेसाठी प्रवीणजी लुंकड चेअरमन सुरज फाउंडेशन यांनी मोलाचे सहकार्य केलेले असून ते सध्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत पुणे बालेवाडी नंतर जवळजवळ दहा ते बारा स्पर्धा घेण्याचा मान नव कृष्णा व्हॅली स्कूल ला मिळाला आहे प्रत्येक वर्षी किमान एक तरी स्पर्धा घेण्यात येते तरी सांगलीकर यांनी याचा लाभ घ्यावा तसेच दिनांक 23 जुलै रोजी नव कृष्णा व्हॅली येथे कृष्णा व्हॅली टेबल टेनिस अकॅडमी ची सुरुवात होणार आहे तसेच या स्पर्धेसाठी प्रिसाइड कंपनीचे टेबल टेनिस चे टेबल स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत तरी ज्या क्लब संस्थांना टेबल हावे आहेत त्यांनी संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आजच्या दिवसभराच्या स्पर्धेमध्ये पुढील प्रमाणे निकाल

महिला (दुसरी फेरी)

समृद्धी कुलकर्णी(सोलापूर) विजयी विरुध्द राधिका सकपाळ(पुणे) 11/5,16/14,11/8

धनश्री पवार (पुणे) विजयी विरुध्द हार्दी पटेल (मुंबई उपनगर) 12/10,11/4,11/9

श्रेया देशपांडे(ठाणे) विजयी विरुध्द सायली जाधव(बीड) 11/2,11/3,11/4

मानसी चिपळूणकर (मुंबई शहर) विजयी विरुध्द तितक्षा पवार (पुणे) 11/5,11/6,9/11,6/11,11/3

श्रावणी सावंत (ठाणे) विजयी विरुध्द वैष्णवी देवगडे (पुणे) 11/7,11/3,11/6

श्रुती अमृते(ठाणे) विजयी विरुध्द योगेश्वरी कुलकर्णी(पुणे) 11/4,11/9,11/3

आर्या सोनगडकर(ठाणे) विजयी विरुध्द मिताली पुरकर(नाशिक) 13/11,11/6,10/12,11/7

पूनम यादव(ठाणे) विजयी विरुधद सुष्मिता जाधव(पुणे) 11/9,11/7,11/3

पृथा वर्टीकर(पुणे) विजयी विरुध्द दिव्या केणी(मुंबई उपनगर) ११/३,११/१,११/६

श्वेता पार्टे नायक (मुंबई शहर) विजयी विरुध्द मुक्ता दळवी (मुंबई उपनगर) 7/11,11/6,11/7,7/11,11/8

विधी शाह (मुंबई उपनगर) विजयी विरुध्द मनीषा सरदेशमुख(सातारा) 11/4,11/6,11/2

सेन्होरा डिसूझा (मुंबई शहर) विजयी विरुध्द काजल जैस्वाल (औरंगाबाद) 11/1,11/3,11/5

टिप्पण्या