*'यशवंत ' मधील श्री.विनायक मळगे ३१ मे रोजी सेवानिवृत्त


 नांदेड:( दि.३० मे २०२३) 

          श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील कार्यालयीन कर्मचारी स्टेनोग्राफर श्री.विनायक मळगे आपल्या ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार दि.३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

           त्यांनी माजी प्राचार्य वर्दाचार्यलू, माजी प्राचार्य आणि संस्थेचे विद्यमान कार्यकारिणी सदस्य डॉ.बी.एस.ढेंगळे, डॉ.एन.व्ही.कल्याणकर, डॉ.ए.एन.जाधव आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या कार्यकाळात आपली सेवा आणि कर्तव्य अत्यंत दक्षतेने प्रामाणिकपणे पार पाडले तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शिक्षकेत्त्तर कर्मचारी सिनेट सदस्य आणि नांदेड जिल्हा लघुलेखक संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहिले.

           श्री.विनायक मळगे यांना सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखी, समाधानी, आरोग्यदायी आणि आनंदी जावो; अशा शुभेच्छा प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, सुपरवायझर प्रा.उमेश चव्हाण, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव,ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, संशोधन समितीचे समन्वयक डॉ.एम.एम.व्ही. बेग, डॉ.अजय गव्हाणे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालय अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, लेखापाल व्ही.पी.सिंग ठाकूर आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
इमेज