दिगंबरराव घंटेवाड यांचे निधन

नांदेड: नांदेडच्या 'सिडको' वसाहतीअंतर्गत एनडी-४१, संभाजी चौक परिसरातील रहिवासी तथा महाराष्ट्र राज्य शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते दिगंबर रामजी घंटेवाड (वय-७२ वर्षे) यांचे हृदयविकाराने १६ मे रोजी रात्री निधन झाले. दिवंगत दिगंबरराव घंटेवाड यांच्या पार्थिव देहावर १७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता नवीन नांदेड भागातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील घंटेवाड तसेच अनिल घंटेवाड यांचे 'ते' वडील होत.

टिप्पण्या