शेतकऱ्यांनो हळद टप्प्याटप्प्याने विका - प्रल्हाद इंगोले हळद भावा सुधारणा

नांदेड गेल्या आठवड्यात हळदीच्या दराने एक हजार रुपयाची उसळी घेतली त्यामुळे हळद बाजारात समाधानाचे वातावरण. बाजारात आवक वाढत आहे त्यामुळे पुन्हा दर कमी होऊ नये ते असेच किंवा चढते राहण्यासाठी हळद बाजारात एकदाच न आणता टप्प्याटप्प्याने आणावी असे आवाहन शिवसेनेचे शेतकरी नेते तथा शेतकरी मित्र फार्मर फोटो सर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे.

  आठवड्या पर्यंत हळदीचे दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल खाली आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघणे शक्य शक्य नव्हते. म्हणून बहुतांश शेतकऱ्यांनी आहे त्या दरात हळद विकून पुढच्या सीजनमध्ये हळद नको म्हणून बेणेही लावण्यासाठी ठेवले नाही. मागच्या चार दिवसापासून हळदीच्या दरात सुधारणा होऊन हजार रुपयाची वाढ झाली आहे. आज घडीला हळद ही साडेसहा ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकत आहे. थोडे भाव वाढल्याचे करताच बाजारात मोठ्या प्रमाणावर हळदीची आवक होत आहे. शेतकऱ्यांनी आपली हळद एकदाच विकण्यासाठी आणली तर व्यापारी हळदीचे भाव कमी करू शकतात. सांगली व वसमत येथील काही व्यापारी नांदेडच्या बाजारात आल्याने बाजारातील आलेल्या हळदीची विक्री चांगल्या दराने झाली. हळद विकणे त्याचे वजन होणे व शेतकऱ्यांना पैसे वेळेवर मिळणे आवश्यक आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी आपला माल विकण्याची घाई न करता टप्प्याटप्प्याने हळद विकली तर भाव चढते राहतील असा अनेक तज्ञाचा अंदाज आहे. एकदाच हळद विकण्याची घाई न करता वाढत्या दराचा शेतकऱ्यांना लाभ होईल असे आवाहन शिवसेनेचे शेतकरी नेते तथा शेतकरी मित्र फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे

टिप्पण्या
Popular posts
पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश
इमेज
मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)
इमेज
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी
इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज
कामगार संघटनेच्या कार्यात कामगार कार्यकर्ते महत्त्वाचे- एस. के. शेट्ये*
इमेज