डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंबुलगा येथे सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण*

 


*कंधार दिनांक 29 एप्रिल (प्रतिनिधी)*

भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्वा  जयंतीनिमित्त आंबुलगा तालुका कंधार येथे सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदेड जिल्हा महिला कॉग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण दिनांक 29 एप्रिल शनिवारी सकाळी 10 वाजता करण्यात आले,यावेळी माजी जि.प सदस्य मनोहर पाटील तेलंग,एडवोकेट विजय पाटील धोंडगे कृष्णाभाऊ भोसीकर,माजी पंचायत समिती सभापती पंडीतराव देवकांबळे,माजी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण भारतीय बौध्द महासंघाचे तालुकाअध्यक्ष विलासराव कांबळे  माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ देवकांबळे माधवराव मुसळे सरपंच प्रतिनिधी पांडुरंग मुसळे माजी नगरसेवक प्रल्हाराव गायकवाड जयंती मंडळाचे अध्यक्ष किरण वाघमारे प्रभाकर व्यवहारे आदींसह जयंती मंडळ व गावातील नागरिक उपस्थित होते 

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले जयंती मंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला सौ.वर्षाताई भोसीकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देऊन मिरवणूक शांततेत पार पाडण्या चे आव्हान केले या जयंती निमित्त आयोजित क्रिकेट सामन्यांचे बक्षीस वितरण कृष्णाभाऊ भोसीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.प्रतिवर्षी प्रमाणे मोठ्या थाटामाटात उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मान्यवर व गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंती मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

टिप्पण्या