जनसामान्यांचा ‘आपला माणूस’ सदाशिव पुरी

  सामाजिक क्षेत्रात वावरत असताना अनेकजण आपापल्या पद्धतीने योगदान देत असतात. राजकीय क्षेत्रात सक्रिय राहून अध्यात्मिक तसेच समाजसेवेला झोकून द...

 

सामाजिक क्षेत्रात वावरत असताना अनेकजण आपापल्या पद्धतीने योगदान देत असतात. राजकीय क्षेत्रात सक्रिय राहून अध्यात्मिक तसेच समाजसेवेला झोकून देणारे सदाशिव महाराज पुरी हे वेगळेच समीकरण आहे. जन्मजात राजकारणाचा पिंड नसणार्‍यांपैकी ते एक आहेत. मा.ना. अशोकरावजी चव्हाण साहेब, डी.पी. सावंत, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या नेतृत्वाखाली ते कॉंग्रेस पक्षाकडे आकर्षित झाले. सांगवी प्रभाग हा तसा दुर्लक्षीत भाग होता. या परिसराचा विकास व्हावा येथील जनतेला सर्व नागरी पायाभूत सुविधा मिळाव्यात असा प्रामाणिक प्रयत्न सदाशिव महाराज यांनी सुरु केला. यामध्ये ते यशस्वी देखील झाले आहेत.
नांदेडपासून जवळच असलेले सांगवी हे गाव १९९७ पासून महानगरपालिकेत समाविष्ट झाले. तेंव्हा अनेक नागरी सुविधांचा अभाव होता. त्या ठिकाणी कच्चे रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा आदींसह वेगवेगळ्या समस्या होत्या. तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे या भागाचा म्हणावा तसा विकास झालाच नाही. अनेक वर्षे येथील जनता खेडेगावातील दिनचर्येची अनुभूती घेत होती.
अलिकडच्या काळात हे सर्व चित्र पालटून गेले आहे. अशक्य त्या गोष्टी शक्य झाल्या आहेत. आज सांगवी प्रभागात सर्व नागरी सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. काही शिल्लक आहेत, ती बाब वेगळी. त्या देखील पूर्ण होतील यात अजिबात शंका नाही. सदस्य पुरी महाराज यांचे कार्य लक्षात घेता नगरसेवक प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. अगदी पिढ्यान्‌पिढ्यांपासून बौद्ध स्मशानभूमीचा प्रश्‍न प्रलंबित होता व तो अत्यंत जटील होता. तथापि या प्रश्‍नी सदाशिव महाराज यांनी सर्व पुरातन दस्तऐवज प्राप्त करुन स्मशानभूमी उभी केली. त्या ठिकाणी सुशोभीकरण केले. आज त्या ठिकाणी अंत्यविधी पार पडत आहेत. त्यासोबतच हिंदू स्मशानभूमीसाठी रस्ता नव्हता तिथे देखील रस्त्यासह सुरक्षा भिंत होणार आहे. म्हाळजा येथे मलनिस्सारण प्रकल्प होणार आहे. त्यामध्ये सांगवी व परिसरातील नगरांचा समावेश राहणार आहे. अंबानगर येथे महत्त्वपूर्ण अशी पाण्याची टाकी उभी राहणार आहे. या कामासाठी १ कोटी ७५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन घेतला आहे.
सांगवी- म्हाळजा येथील रस्ते व सी.सी. रोडसाठी १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ते देखील काम लवकरच सुरु होणार आहे. जुने गाव सांगवी- विमानतळ चौक येथील नाला व डांबरीकरण यासाठी १ कोटी निधी प्रस्तावित आहे. शिवनेरीनगर, जय भवानीनगर, सांगवी येथील ८० लक्ष रुपयांच्या रस्त्याचे काम देखील मंजूर झाले आहेत. सांगवी प्रभागात आतापर्यंत जवळपास ७५ टक्के एलईडी बसविण्यात आल्यामुळे हा परिसर उजळून निघाला आहे. दरवर्षी हळदी- कुंकवाच्या निमित्ताने प्रभागातील सर्व महिला माता भगिणी यांचा यथोचित सन्मान आजपर्यंत करण्यात आला आहे.
केवळ एकाच समाजाच्या कामासाठी सदाशिव महाराज थांबले नाहीत. त्यांनी मातंग समाजासाठी काकणाई देवीचे मंदिर उभे केले आहे. तसेच सार्वजनिकदृष्ट्या लग्न समारंभ आदी पार पडावेत याकरीता मोठा हॉल तयार केला आहे. मध्यंतरीच्या कोविड काळात त्यांनी अनेकांना घरपोच शिधा पोहोचविला आहे. रेणुकामाता मंदिराच्या परिसरात त्यांनी पेव्हर ब्लॉक बसवून दिले आहेत. अण्णाभाऊ साठे समाज भवनासाठी त्यांनी निधी खेचून आणला. ते भवन आज तयार झाले आहे व तेथे सामाजिक कार्यक्रम होत आहेत.  सांगवी गावातील मंदिर व रस्ते सुशोभीकरणासाठी त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. अंबानगर येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा करताना त्यांनी सर्व समाज बांधवांना एकत्रित आणून ऐतिहासिक कार्यक्रम घडवून आणला. सदर विहाराच्या परिसरात पेव्हर ब्लॉकसह अत्यंत महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे.
नगरसेवक प्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना नागरी सुविधा पुरविण्याचे कर्तव्य असले तरी सदाशिव महाराज यांनी अगदी शेवटच्या गोरगरीब जनता राहत असलेल्या नागरी वस्त्यांचा विचार करीत त्या ठिकाणी नळ व रस्ते बांधणीचे काम केले आहे. ज्या ठिकाणी काहीच नाही तिथे मुरुम, गिट्टी आदी टाकून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदर सदाशिव महाराज यांचे कार्य प्रभागासाठी अतुलनीय असे आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना करतो.
- प्रा.डॉ. सुभाष बुक्तरे, सांगवी- नांदेड

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel