*सेपक टकारा खेळास प्रोत्साहन देऊ: उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही*.
नागपूर (क्रीडा प्रतिनिधी)
देशात सेपक-टॅकरा या खेळाची पाळेमुळे प्रथम नागपुरातच रुजली आहेत. नागपूरमध्ये रुजलेला खेळ देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देत असेल तर या खेळाचे पालकत्व घ्यायला निश्चितच आनंद होईल. या खेळाचे प्रशिक्षण, त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
३३ व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ विभागीय क्रीडा संकुल, मानकापुर नागपूर येथे
१ एफ्रिल शनिवारी रोजी महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सेपक टॅकरा फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. योगेंद्र सिंह दहिया, उपस्थित होते.महासंघाचे राष्ट्रीय सचिव वीरागौडा, महाराष्ट्र सेपक टॅकराचे अध्यक्ष विपीन कामदार, सचिव डॉ. योगेंद्र पांडे, नागपूरचे
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, आयोजक डॉ. अमृता पांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होती.
फडणवीस पुढे म्हणाले, नागपूर या खेळाची भारतातील जननी आहे. त्यामुळे निश्चितच या
खेळाच्या लोकप्रियतेसाठी आणि प्रशिक्षणासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न केले जातील. राष्ट्रीय स्तरावरील आयोजक व स्थानिक स्तरावरील आयोजक यांनी एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी सुचविले. यावेळी स्पर्धक खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत प्रत्येकाने आपले राज्य जिंकावे यासाठी प्रयत्न करा आणि जेव्हा देशासाठी खेळाल त्यावेळी तिरंग्याचा सन्मान राखा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी सेपक-टॅकरा खेळाला नागपूरमध्ये पालकत्व देण्याची घोषणा केली. पोलीस आणि सीमासुरक्षा दलाचे दोन संघ या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले आहे.. भारतात नागपूर शहरात हा खेळ रुजला आहे. नागपूरने या खेळासाठी अनेक राष्ट्रीय खेळाडू दिले आहेत.

COMMENTS