बेटमोगरा येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी

   जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर नामफलकाचे अनावरण    मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर  तालुक्यातील बेटमोगरा येथे सम...

 



 जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर नामफलकाचे अनावरण 

 

मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर 


तालुक्यातील बेटमोगरा येथे समतानायक,क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती दि.२२ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.यादरम्यान शिवलिंग बादशाह मठ संस्थानचे मठाधिपती सद्गुरू डॉ.सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर व माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यासोबत वरील मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या नियोजित जागेवर नामफलकाचे अनावरण वीरशैव समाज बांधव व गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

         यावेळी,सरपंच नय्युम दफेदार, उपसरपंच ज्ञानेश्वर तळणे, सोसायटी चेअरमन दत्तात्रय पाटील,कार्यक्रमाचे आयोजक धनराज पाटील,प्रा.संदीप पाटील,माजी तंटामुक्त अध्यक्ष भानुदास पाटील,चिनू पाटील,माजी सरपंच खुशाल पाटील,माजी सरपंच सुरेश नवलेकर,मष्णा बाऱ्हाळे, प्रकाश नारायण पाटील,बाबु पाटील, परमेश्वर पाटील, गजानन पाटील, सुभाष पाटील, गणेश अन्सापूरे,रितेश सावकार गुंडावार,महाजन मामा ढेकळे,बाळासाहेब ढेकळे,उत्तम पाटील व वीरशैव समाज बांधवांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

               याप्रसंगी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक धनराज पाटील यांच्यासह वीरशैव समाज बांधवांनी आभार व्यक्त केले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel