मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा अंबुलगा येथील सह शिक्षक पद्माकर भरतराव जवळदापके यांना नुकतेच तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांच्या एकोणिस वर्षाच्या सेवेतील शैक्षणिक ,सामाजिक,कार्याची दखल घेऊन तालुकास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सुरवातीला हिमायतनगर तालुक्यातील जि.प.प्रा.शा.टेंभुर्णी येथे मुख्याध्यापक म्हणुन कार्यरत असताना शाळेला "साने गुरुजी स्वच्छ शाळा"व गावाला राष्ट्रीय स्तरावरील निर्मल ग्राम पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते देण्यात आला होता.या मुळे टेंभुर्णी ग्रामपंचायत मार्फत त्यांचा प्रशस्तीपत्र देवुन सन्मान करण्यात आला होता.सन 2011 साली त्यांची बदली जि.प.प्रा.शा.कोटग्याळ ता.मुखेड येथे झाली.या शाळेत सुद्धा त्यांनी मुख्याध्यापक म्हणुन अतिशय मोलाचे कार्य केले,शाळा रंगरंगोटी,वृक्षारोपण, शाळा डिजिटल करणे,सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रमाच्या माध्यमातुन शाळेची पटसंख्या 57वरुन 84 झाली. व द्विशिक्षकी शाळा ही तीन शिक्षकी झाली.विद्यार्थी हेच दैवत मानुन समर्पित भावनेने आपले काम करतात.सन2018 मध्ये त्यांची बदली के.प्रा.शा.अंबुलगा येथे झाली.या शाळेमध्ये सुद्धा त्यांनी विविध उपक्रम राबवले.वृक्षारोपण,शिष्यवृत्ती वर्ग,सांस्कृतिक कार्यक्रम ,पालकांशी अत्यंत सलोख्याचे संबध,तसेच बि.एल.ओ.म्हणुन उत्कृष्ट कार्य केल्यामुळे तहसिलदार मुखेड यांच्या कडुन विशेष सन्मान करण्यात आला.सन 2020-21इयत्ता पाचवी वर्ग शिक्षक असताना विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले. अशा विविध उपक्रमाची दखल घेऊन मुखेड पंचायत समितीच्या वतीने दि15/04/2023 रोजी "आदर्श शिक्षक पुरस्कार"मुखेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार डा.तुषार राठोड यांच्या शुभहस्ते देण्यात आला.फेटा,पुर्ण वस्त्र,सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र, देवुन सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे,विस्तार अधिकारी विठ्ठलराव वडजे,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक गोविंद चव्हान,राज्य पुरस्कार प्राप्त डा.शिवाजीराव कराळे,दिलीपराव, देवकांबळे,शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर,मुख्याध्यापक साईबाबा नल्लामडगे ,केंद्रप्रमुख सुर्यकांत दासरवार,अशोक चव्हाण उपस्थित होते.त्यांच्या यशाबद्दल शिवश्री पंचायत समिती मुखेडचे माजी उपसभापती बालाजी पाटील अंबुलगेककर,सरपंच सौ.अर्चना ताई रापनवाड,उपसरपंच शरद पाटील,गंगाधर पाटील,पोलीस पाटील विठ्ठल कौरवाड,बाबु सावकार उलीगडे,गंगाधर मंत्रे,सचिन रामदिनवार,पत्रकार विठ्ठल कल्याणपाड,माजी गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव माकणे,शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर जंपलवाड, यशवंतराव बोडके,शिवाजीराव इंगोले,शरदराव डावकरे,संजय कोटगीरे,शिवराज साधु,माधव मादसवाड,जगदीश जोगदंड,कल्याण इंगळे,बस्वराज निर्णे,राम जाधव,आनंदा गजेले,माधव बारमाळे,प्रदीप तरगुडे,बस्वराज साधु,गुणवंत झाडे,दत्ताजी बिरादार,गजानन गोंड,संदीपकुमार पेंडलवार ,संगमेश्वर स्वामी,अनुराधा मोरे,राजश्री धमणे,पांडुरंग जवळदापके,नागनाथ बिरादार,अंगद जायबंद्रे,यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS