मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर
सर्व धर्मसमभाव व सामाजिक एकोपा जपण्यासाठी माजी पं.स.सभापती बळवंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी दि.८ एप्रिल रोजी तालुक्यातील बेटमोगरा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करुन सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले आहे.
यादरम्यान माजी पं.स.सभापती बळवंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यासह कृउबा समितीचे संचालक दत्तात्रय पाटील बेटमोगरेकर,बालाजी पाटील बेटमोगरेकर,माजी सोसायटी चेअरमन प्रकाश पाटील,प्रा.श्रीधर पाटील, डॉ.दत्ता पाटील यांनी सर्व मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने उपस्थितीत मान्यवरांच्या शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी आबा देशाई,व्यंकट पोतदार, माधवराव पाटील,यादवराव पाटील,प्रविण पाटील,अरुण देशाई,दिलीप पाटील,राम तळणे यांच्या सह मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



COMMENTS