प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल हिंगोली जिल्हा पोलिस दलातील पाच अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र जाहिर झाले आहे.
प्रतिवार्षिक महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी व सतत उल्लेखनीय कार्य व प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस अधिकारी व अंमलदार यांना पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचेकडून पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. त्यानुसार 2022 करीता हिंगोली पोलिस दलातील हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत अंमलदार अशिष उंबरकर व स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत अंमलदार विठ्ठल कोळेकर यांनी आपल्या आठरा वर्षाच्या कार्यकाळात पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल व ईतर तीन अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह जाहिर झाले आहे. सदर सन्मान चिन्ह 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जिल्हाधीकारी, पोलिस अधीक्षक, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. कोळेकर, उंबरकर यांना महासंचालक सन्मान चिन्ह जाहिर झाल्या बद्दल हिंगोली पोलिस दलातील अधिकारी कर्मचारी व मित्र मंडळी च्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


COMMENTS