माहुर शहरातून जाणार्‍या राष्टीय महामार्गाला वाहतुक सुरु होण्याआधीच गेले तडे! संबधीत विभागाने कामावर लक्ष देण्याची गरज.

      राम दातीर  
माहुर (प्रतिनिधी) माहुर शहरातून जाणार्‍या राष्टीय महामार्गाचे काम निक्रुष्ट दर्जाचे होत असून वाहतुक सरु होण्या आधी जागोजागी तडे गेले आहेत. 
 धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने होत असून शहरातून जाणार्‍या महामार्ग दत्तचौक (टिपॉईंट) ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत  वाहतुक सुरु होण्याआधीच या मार्गाला जागोजागी तडे गेले आहेत.
सदरचे काम हे अतिशय निक्रुष्ट दर्जाचे होत असल्याने सदर कामाची गुणनियंत्रण विभागाकडून तपासणी करण्यात यावी अशी मागणी माहुरवासियांकडुन होत आहे.दिनांक १९मे २०२३रोजी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी स्कायवॉकच्या भुमीपुजन करण्यासाठी माहुर येथे येत असून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली जाणार असल्याचे भाजपा तालुका प्रवक्ते विजय आमले यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. 


टिप्पण्या