सी. एम. ई. खात्यातील चार्जमन रमाकांत दळवी यांचा कामगारांतर्फे भव्य सत्कार*

मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य यांत्रिक खात्यातील विद्युत विभागाचे चार्जमन रमाकांत दळवी ३१ मार्च २०२३ रोजी प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले...


मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य यांत्रिक खात्यातील विद्युत विभागाचे चार्जमन रमाकांत दळवी ३१ मार्च २०२३ रोजी प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले त्यानिमित्त त्यांचा वर्कशॉप येथे ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये साहेब यांच्या शुभहस्ते सेवानिवृत्ती बद्दल शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सपत्नीक भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के.शेट्ये, युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, कार्याध्यक्ष डॉ. यतिन पटेल, सेक्रेटरी व बोर्ड मेंबर दत्ता खेसे, सेक्रेटरी विजय रणदिवे, प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव, उपाध्यक्ष निसार युनूस, संघटक चिटणीस विष्णू पोळ, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनगुटकर, सेवानिवृत्त कार्याध्यक्ष नंदू राणे, अधिकारी वाधवाणी, बामणे, युनियनचे कार्यकर्ते आप्पा सूर्यवंशी, श्रीकृष्ण पडेलकर, योगिनी दुराफे, निशा बोरगावकर, समिर कसबे, विजय पांदिरकर, महेंद्र चौगुले, विजय सोमा सावंत, शिवाजी राणे, गमरे, सुभाष अनुभवणे, मिलिंद सावंत, दै. नवाकाळचे स्तंभलेखक व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नारायण गव्हाणे, इत्यादी मान्यवरांनी शुभेच्छा देताना, रमाकांत दळवी हे कामामध्ये कार्यतत्पर असून, फोटोग्राफी हा त्यांचा आवडता छंद जरी असला तरी त्या माध्यमातून त्यांनी अनेक माणसं जोडली आहेत. ते एक क्रिकेटचे उत्तम खेळाडू असून, खोखो महापौर स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. कामगार चळवळीची आवड व एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते सेवेत असताना त्यांनी युनियनच्या प्रत्येक आंदोलनाचे व कार्यक्रमाचे छायाचित्रण केले आहे. ते एक निस्वार्थी व प्रामाणिक कार्यकर्ते असून, त्यांचे युनियनच्या कार्यात फार मोठे योगदान आहे, अशा प्रकारे सर्वच वक्त्यांनी कौतुकास्पद भाषणे केली. सभेचे सुंदर सूत्रसंचालन युनियनचे खजिनदार विकास नलावडे (नाना) यांनी केले. सत्कार सोहळ्याला रमाकांत दळवी यांचे कुटुंब, नातेवाईक, आजी-माजी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीएमई खात्यातील व इतर खात्यातील कामगारांनी त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.

आपला 

मारुती विश्वासराव 

प्रसिद्धीप्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel